जलवाहिनीच्या गळतीवर वर्षाला पाच लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:10+5:302021-02-05T09:17:10+5:30
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेच्या जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहेत. ही गळती काढण्याचे काम ...

जलवाहिनीच्या गळतीवर वर्षाला पाच लाखांचा खर्च
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेच्या जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहेत. ही गळती काढण्याचे काम पालिकेकडून तातडीने हाती घेतले जात असले, तरी या कामी वर्षाकाठी पाच लाखांचा भुर्दंड पालिकेला सहन करावा लागत आहे.
सातारा शहराची लोकसंख्या १ लाख २२ हजार १९५ इतकी असून, हद्दवाढीमुळे हा आकडा आता दोन लाखांच्या घरात गेला आहे. या लोकसंख्येला कास व शहापूर जलयोजनेच्या माध्यमातून दररोज १३ लाख लीटर तर जीवन प्राधिकरणकडूनही सुमारे २७ लाख लीटर पाणीपुरवठा केला जातो.
पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. ही गळती रोखण्यासाठी प्रशासनाला वर्षाकाठी सुमारे पाच लाखांचा फटका बसत आहे. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण करून जुन्या जलवाहिन्या बदलणे गरजेचे बनले आहे.
(पॉइंटर्स)
२५०००००० शहरातील पाणी पुरवठ्याचे वर्षाचे बजेट
२००००००० पाणी पुरवठ्यावरील वर्षाचे वीजबिल
३० पाणीपुरवठा संदर्भातील एकूण कर्मचारी
(फोटो चौकट ०१)
पालिका परिसर : सातारा पालिकेच्या मुख्य व जुन्या प्रवेशद्वारासमोर जलवाहिनीला लागलेल्या गळतीतून पाण्याचे पाट वाहत असतात. तब्बल दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पालिकेने आजवर अनेकदा येथील गळती काढण्याचे काम केले आहे. मात्र, तरीही हा प्रश्न काही सुटलेला नाही.
(फोटो चौकट ०२)
पोलीस वसाहत : साताऱ्यातील पोलीस वसाहत परिसर, शनिवार पेठ, गुरूवार पेठ, बुधवार नाका, बोगदा या परिसरातील व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे असून, पाण्याचा अपव्यव सुरूच आहे. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
(फोटो चौकट ०३)
सदर बझार : सदर बझार परिसराला पालिका व जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. येथील जलवाहिन्यांना सातत्याने गळती लागते. मुथा चौक, लक्ष्मी टेकडी, जिल्हा बॅँक, समर्थ मंदिर येथील जलवाहिनीतून दररोज हजारो लीटर पाणी गळतीमुळे वाया जाते.
(चौकट)
गळतीमुळे ८.५० टक्के पाणी वाया
सातारा पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात गळतीमुळे ८.५० टक्के पाणी वाया जात असल्याने स्पष्ट झाले आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या व व्हॉल्व्ह कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे ही गळती कायमस्वरूपी रोखण्यासाठी नवीन जलवाहिन्यांचे जाळे प्रशासनाला विणावे लागणार आहे.
(कोट)
सातारा शहरात जलवाहिनी व व्हॉल्व्हला गळती लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशी गळतीची ठिकाणे शोधून दुरुस्ती करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जातील.
- सीता राम हादगे, पाणीपुरवठा सभापती
फोटो :
२५ पालिका परिसर
२५ पोलीस वसाहत
२५ सदर बझार