सहा गावांच्या पाणी योजनांसाठी पाच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:47 IST2021-07-07T04:47:49+5:302021-07-07T04:47:49+5:30

घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. संबंधित गावांनी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी ...

Five crore fund for water schemes of six villages | सहा गावांच्या पाणी योजनांसाठी पाच कोटींचा निधी

सहा गावांच्या पाणी योजनांसाठी पाच कोटींचा निधी

घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. संबंधित गावांनी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळण्याची मागणी केली होती. त्यासाठी गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. लोकप्रतिनिधींनाही याबाबत मागणीचे निवेदन देण्यात आले होते. अखेर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित गावांची गरज लक्षात घेऊन पाणी योजनेसाठी निधी मंजूर केला आहे. जल जीवन मिशनअंतर्गत पुण्याच्या मुख्य अभियंत्यांकडून संबंधित सहा गावांच्या पाणी योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली होती. ही कामे कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. त्यानुसार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा केला आणि सहा गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली.

जलजीवन मिशनअंतर्गत घोगाव गावासाठी ९५ लाख ४६ हजार, बामणवाडीला १ कोटी १४ लाख ९६ हजार, भुरभुशीला ३८ लाख ८५ हजार, येवतीला १ कोटी १८ लाख ६ हजार, साळशिरंबेला ३७ लाख ४४ हजार, कोळेवाडीला ८५ लाख ४० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कामाची निविदा निघाल्यानंतर ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.

Web Title: Five crore fund for water schemes of six villages