शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल हॅक करून महिलेच्या बँक खात्यातून साडेपाच लाख रुपये केले लंपास, साताऱ्यातील घटना

By नितीन काळेल | Updated: March 17, 2023 14:21 IST

मोबाइलला येणाऱ्या ओटीपीद्वारे सलग पाच व्यवहार केले

सातारा : माेबाईल हॅक करून सातारा शहरातील एका महिलेच्या बँक खात्यातून पाच व्यवहार करून सुमारे साडेपाच लाख रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखीवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी कल्याणी वसंत माने (सध्या रा. गोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दि. १४ मार्च रोजी सकाळी सवा आकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. तक्रारदार महिलेने मोबाईलवरून ऑनलाईन ट्रांझेक्शन केले होते. हे ट्रांझेक्शन चुकीचे झाल्याने संबंधित बँकेच्या ऑनलाईन तक्रारीबाबत माहिती घेतली. त्यावेळी तक्रारदारला एक मेाबईल क्रमांक मिळाला. त्यावर काॅल केला असता अज्ञाताने चुकीच्या ट्रांझेक्शनचे पैसे परत मिळविण्यासाठी प्रोसेस करण्यास सांगितले. त्यासाठी व्हाॅटसअॅपवर तक्रारदार महिलेला डेबीट कार्डचा फोटो आहे का? हे पाहण्यास सांगितले. त्यामुळे तक्रादारने डेबीट कार्डचा फोटो पाहिला. त्यानंतर अनोळखीने तक्रारदाराचा मोबाईल हॅक केला. तसेच तक्रारदाराच्या मोबाइलला येणाऱ्या ओटीपीद्वारे सलग पाच व्यवहार केले. यामधून ५ लाख ४४ हजार ४२९ रुपये अज्ञाताने स्वत:च्या बँक खात्यावर वर्ग केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम