मुळीकवाडी धरणात बोटीद्वारे मासेमारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST2021-03-16T04:39:25+5:302021-03-16T04:39:25+5:30

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी ८४ गावांत पाण्यासाठी गावेच्या गावे स्थलांतर होत त्या गावात धोम-बलकवडी पाणी आल्यामुळे पाझर तलावात ...

Fishing by boat in Mulikwadi dam ... | मुळीकवाडी धरणात बोटीद्वारे मासेमारी...

मुळीकवाडी धरणात बोटीद्वारे मासेमारी...

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी ८४ गावांत पाण्यासाठी गावेच्या गावे स्थलांतर होत त्या गावात धोम-बलकवडी पाणी आल्यामुळे पाझर तलावात पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन उन्हाळ्यात फुग्यावरून होणारी मासेमारी बोटीद्वारे होत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यातील ८४ गाव सालपे, आदर्की-जावलीपर्यंतच्या गावांना उन्हाळा व प्रत्येक चार-पाच वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळात जनावरांसह स्थलांतर करायचे व पावसाळ्यात गावाकडे यावे लागते. त्यामुळे तरुण शिक्षण अर्धवट मुंबईत जाऊन हमाली करून गुजराण करत होते. १९७२ च्या भयानक दुष्काळात दिवंगत माजी आमदार चिमणराव कदम यांनी तालुक्याचा पायी दौरा करून धरण, पाझर तलाव, माती बांध यांचे सर्वेक्षण करून १९७२ ते १९८२ पर्यंत रोजगार हमी योजनेतून शेकडो पाझर तलाव बांधले. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले. त्यानंतर पर्जनमान कमी झाल्याने काही तलाव कोरडे राहू लागले. त्यानंतर दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न युती शासनाच्या काळात १९९६ मध्ये धोम-बलकवडी धरणास मंजुरी मिळाली, त्यावेळी सातारा लोकसभा मतदार संघाचे हिंदुराव नाईक-निंबाळकर खासदार होते, तर फलटण-खंडाळा तालुक्यांचे अपक्ष आमदार रामराजे नाईक-निंबाळकर निवडून आले होते.

धोम-बलकवडी माती धरणाचे काम झाले; पण कालव्याची कामे निधीअभावी रखडली. पण शरद पवार व रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रयत्नामुळे केंद्रीय जल आयोगाने कालव्याच्या कामास निधी उपलब्ध झाल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत १४८ किलोमीटरपर्यंत पोहोचले; पण पोट कालव्याची कामे निधीअभावी रखडली आहे. धोम -बलकवडी उजव्या कालव्यातून ओढ्याला पाणी सोडून पाझर तलाव भरून घेतले जातात. त्यामुळे शेतीला पाणी मिळते तर तलावात पाणी साठून राहिल्याने मच्छीमारीचा व्यवसाय वाढीला लागल्याने समाधIन व्यक्त होत आहे.

(चौकट)

व्यवसाय टिकून..

पावसाळ्यात धरणे भरली तरी उन्हाळा व दुष्काळ यामुळे पाणीसाठा कमी होऊन मासेमारी लोक तोटा सहन करून व्यवसाय करीत होते; पण गत दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व कालव्याचे पाणी यामुळे पाणीसाठा टिकून असल्याने बोटीद्वारे मासेमारी करावी लागत आहे.

(प्रतिक्रिया)

धरणामध्ये पाणीसाठा होत नव्हता त्यावेळी फायदा होत नव्हता. आता कालव्याच्या पाण्यामुळे फायदा होत आहे. पण कोविड १९ मुळे आठवडे बाजार बंद असल्याने माल असूनही विक्री होत नाही.

-अमित भोई, चेअरमन, मच्छिमार संस्था फलटण

१५आदर्की मासेमारी

फोटो : मुळीकवाडी (ता . फलटण) येथील धरणात बोटीद्वारे मासेमारी सुरू आहे.

Web Title: Fishing by boat in Mulikwadi dam ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.