शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

‘जान’करांच्या रूपाने पहिल्यांदाच ‘मान’

By admin | Updated: July 9, 2016 00:44 IST

२५ वर्षांचा संघर्ष : माणमधील महादेव जानकर यांची मंत्रिमंडळात वर्णी

नितीन काळेल --सातारा --स्वत:चा पक्ष स्थापन करणे, दबाव निर्माण करणे आणि त्या माध्यमातून सत्तेत जाणे, हे सर्वसामान्य घरातील व्यक्तीसाठी अशक्यच गोष्ट. पण हे धाडस लिलया पार केले ते एका सामान्य घरातील महादेव जानकर यांनी. माण तालुक्यातील पळसावडे येथील जानकर यांनी राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या रूपाने माण तालुक्यातील व्यक्तीला प्रथमच कॅबिनेट मंत्रिपदाचा ‘मान’ मिळाला आहे. तर राजकारण, समाजकारणात ‘जान’कार असणाऱ्या त्यांच्या २५ वर्षांच्या संघर्षालाही यश आले आहे. माण तालुक्याला एक इतिहास आहे. माण म्हटले की माणदेशही आठवतो. या तालुक्यातील व जिल्ह्याचे शेवटचे टोक असणाऱ्या आणि सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील पळसावडे हे महादेव जानकर यांचे गाव. पिढ्यान्पिढ्यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय असणारे हे कुटुंब. आई-वडीलही दरवर्षी काही महिने मेंढ्या जगविण्यासाठी आपले पळसावडे गाव सोडून बाहेर जायचे. सातारा परिसरात असताना वाढे येथे १९ एप्रिल १९६८ रोजी महादेव जानकर यांचा जन्म झाला. जानकर यांना एकूण तीन भावंडे. त्यामध्ये एक बहीण व दोन भाऊ, सर्वात लहान महादेव जानकर हेच. आई-वडील व मेंढ्यांबरोबरच असतानाच जानकर यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. वाढे (सातारा), देवापूर (माण), सातारा आणि सांगली येथे त्यांचे शिक्षण झाले. सांगली येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ते जनरल सेक्रेटरी (जीएस) झाले होते. शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्वत:ची एक विचारसरणी तयार केली होती. तसेच आपला धनगर समाजबांधव आणि बहुजन समाजातील दु:खही त्यांनी पाहिले होते. त्यामुळे आपण या समाजासाठी काहीतरी करायचा याचा निश्चय केला. त्यांनी निश्चय केलाच नाही, तर तो अंमलातही आणण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान, ते यशवंत सेनेच्या माध्यमातून काम करू लागले. १९९२ च्या दरम्यान त्यांनी यशवंत सेना पुनर्जीवित करून मोठ्या प्रमाणावर कार्य हाती घेतले. याचदरम्यान ते बहुजन समाज पार्टीचे कांशिराम यांच्या सानिध्यात आले. त्यानंतर त्यांचे कार्य आणखी अवघड व मोठे झाले होते. याचदरम्यान, त्यांनी म्हसवड येथे धनगर समाजाचा विकास करण्यासाठी लग्न न करण्याची शपथ घेतली. त्यानंतर धनगर समाज व बहुजन समाजासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य हाती घेतले. अनेक वर्षे ते स्वत:च्या घराकडेही फिरकले नाहीत. अनेक वर्षांच्या कार्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. अनेकांना ते आवडलेही नाही. कारण पक्ष काढण्यापेक्षा तो टिकविणे आणि वाढविणे अवघड असते; पण त्यांनी पक्ष टिकविला अन् तो वाढविलाही. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, २०१४ मध्ये बारामती लोकसभा मतदार संघातून त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढविलेली निवडणूक. या निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने महादेव जानकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळेपासूनच जानकर यांची उपयुक्तता मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना-भाजपला दिसून आली. त्यामुळेच जानकर यांची भाजपने विधान परिषदेवर निवड केली. तसेच आता मंत्रिपदाचा लाल दिवाहीदिला. माण तालुक्याचा इतिहास पाहता सुरुवातीची अनेक वर्षे माण हा मतदारसंघ राखीव होता. त्यावेळी विष्णूपंत सोनवणे, धोंडिराम वाघमारे, तुकाराम तुपे, संपत अवघडे आदींनी आमदार म्हणून काम पाहिले. पण, कोणालाही मंत्रिपद मिळाले नाही. २००९ मध्ये माण मतदारसंघ प्रथमच खुला झाला. तेव्हापासून जयकुमार गोरे हे आमदार आहेत. पहिल्यावेळेस आघाडी शासन असतानाही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.आता महादेव जानकर यांच्या रूपाने तालुक्याला प्रथमच मंत्रिपद आणि तेही कॅबिनेट मिळाले आहे. त्यामुळे माणचा ‘मान’ आणखी उंचावला गेला आहे. या मंत्रिपदामुळे तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या आशा, अपेक्षाही वाढलेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात महादेव जानकर यांना जिल्ह्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शाळेत हुशार.. पण समाजकारणाची आवड...महादेव जानकर यांच्या मित्रांनी अनेक किस्से सांगितले. जानकर हे अभ्यासात प्रथमपासून हुशार होते; पण त्यांना समाजकारण आणि राजकारणाची आवड फार होती. १९८२ मध्ये देवापूर येथे सातवीच्या वर्गात असताना म्हसवड येथे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आले होते. त्यावेळी मित्रांबरोबर ते सायकलवरून सभा ऐकण्यासाठी गेले होते. तर सांगली येथे शिक्षण घेत असताना त्यांची समाजाविषयीची तळमळ अधिक जाणवू लागली. त्यावेळी सांगली व परिसरात समाजाविषयीचा मेळावा, कार्यक्रम असला की ते मित्रांना घेऊन जायचे. त्यांचा खर्चही ते करायचे. प्रथमपासूनच त्यांना समाजाविषयीचे प्रेम अधिक असल्याचे दिसून येत होते, असे त्यांचे मित्र आजही सांगतात.