पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २१ नोव्हेंबरला बारामतीत : हेमंत मगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST2021-02-07T04:35:41+5:302021-02-07T04:35:41+5:30
फलटण : बारामतीमध्ये २१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये जगातील अनेक नामवंत धावपटू ...

पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २१ नोव्हेंबरला बारामतीत : हेमंत मगर
फलटण : बारामतीमध्ये २१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये जगातील अनेक नामवंत धावपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुश्रुत हॉस्पिटलचे प्रमुख आणि बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. हेमंत मगर यांनी दिली.
बारामती टेक्स्टाईल पार्क व एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी २१ नोव्हेंबर २०२१ रोजी बारामतीत प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुख्य संयोजक म्हणून स्पर्धेत सहभागी होण्याची संधी डॉ. मगर आर्थोपेडिक इन्स्टिट्यूटच्या जॉइंट अँड स्पाईन क्लिनिक बारामतीला मिळाली असल्याचे डॉ. हेमंत मगर यांनी सांगितले.
डॉ. मगर यांच्या बारामती येथील जॉइंट अँड स्पाईन क्लिनिकच्या माध्यमातून बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंना प्रतिबंधात्मक व दुखापतीनंतर लागणाऱ्या तज्ज्ञ सेवा दिल्या जात आहेत. ५ हजारहून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. २६ जानेवारीनिमित्त आयोजित कार्यक्रमास नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उद्योगपती आर. एन. शिंदे उपस्थित होते. (वा.प्र.)
०६मॅरेथॉन
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. हेमंत मगर यांनी मार्दर्शन केले. यावेळी सुनेत्राताई पवार, पौर्णिमा तावरे उपस्थित होत्या.