शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कारखान्यांचा पहिला हप्ता १८०० रुपये?

By admin | Updated: December 17, 2014 23:04 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : ‘अजिंक्यतारा’नंतर अन्य कारखान्यांच्या हालचाली सुरू

वाठारस्टेशन : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष वेधलेल्या ऊसदराच्या घोषणेत अजिंक्यतारासह साखर कारखान्याने १८०० रुपये पहिली उचल जाहीर केल्यानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांनीही १८०० रुपये दर देण्याची मानसिकता दाखवली आहे. त्यामुळे सुरू हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम कारखानदारांकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यातील एकूण ११ कारखान्यांमध्ये आज अखेर ११ लाख ५२ हजार ५४४ लाख मे. टन उसाचे गाळप झाले असून, ११ लाख ९४ हजार ९६० क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे.कारखाने सुरू होण्यापूर्वीच उसाची पहिली उचल जाहीर होणे अपेक्षित असताना तब्बल दीड महिन्यांचा कालावधी गेला तरी जिल्ह्यात कोणत्याही कारखान्याने उसाचा हप्ता जाहीर केला नाही. केंद्राच्या एफआरपीनुसार तोडणी वाहतूक वजा करता गतवर्षी ऐवढा तरी दर जाहीर होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. सातारा शेजारील पुणे, सोलापूरकरांनी अनुक्रमे १५०० ते १८०० पहिला हप्ता जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील वाढता साखर उतारा लक्षात घेता २१०० ते २२०० रुपये दर जाहीर केला जाईल, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती.एक नोव्हेंबर पासून गाळप सुरू असताना १४ दिवसांत ‘एफआरपी’ रक्कम द्यावी, असा नियम पायदळी तुडवला गेला. दीड महिन्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करायला लावली. यावर साखर आयुक्तांनी सोमवार ते बुधवारपर्यंत पहिली उचल देण्याचा ठराव द्यावा, अन्यथा आर.आर.सी. अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्ह्यातील कारखानदारांना दिला होता. मात्र, अजिंक्यतारा वगळताइतर कोणत्याही कारखान्याने दर घोषित करण्याबाबत अजूनही मौन बाळगले आहे.अजिंक्यतारा कारखान्याने जाहीर केलेल्या १८०० रुपये पहिला हप्ताचाच सूर काढीत आता जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी री ओढली आहे. परंतु १८०० रुपये सुद्धा पहिला हप्ता देणे आव्हानात्मक असल्याचीच बाब काही कारखाना प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.सातारा जिल्ह्यात १८०० ची पहिला हप्ता जवळपास निश्चित झाल्यामुळे चालू हंगामात गतवर्षी इतपतही दर उसाला मिळणार नाही, ही परिस्थती आता समोर आली आहे. (वार्ताहर)..अन्यथा हाच अंतीम दरजर शासनाने सबसिडी दिली तर एफ.आर.पी. तोडणी वाहतूक वजा करता २१०० ते २२०० पर्यंत दर देता येईल; अन्यथा १८०० हाच अंतिम दर असेल, असे मत एका कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.