आधी नोकऱ्या द्या... मग अतिक्रमण पाडा
By Admin | Updated: March 18, 2017 15:33 IST2017-03-18T15:33:03+5:302017-03-18T15:33:03+5:30
उदयनराजे भोसले : दोन दिवसांची अतिक्रमण विरोधी मोहीम गुंडाळली

आधी नोकऱ्या द्या... मग अतिक्रमण पाडा
आॅनलाईन लोकमत
सातारा : सातारा शहरातील अतिक्रमण काढण्यास सातारा पालिका व बांधकाम विभागाने एकत्रितपणे मोहीम राबविली. सातारा-कोरेगाव मार्गावरील अतिक्रमणे शनिवारी काढली जात असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची एंट्री झाली. ह्यआधी बेकारांना नोकऱ्या द्या... मग अतिक्रमण काढा,ह्ण असे आदेश दिल्यानंतर ही मोहीम थांबविण्यात आली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सातारा दौरादरम्यान शहरातील अतिक्रमण काढण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना केल्या होत्या. त्यानुसार सातारा पालिका व बांधकाम विभागाने शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली.
पोवई नाका ते बसस्थानक दरम्यानची अतिक्रमणे शुक्रवारी काढल्यानंतर शनिवारी या पथकाने बॉम्बे रेस्टाँरट परिसराकडे मोर्चा वळविला होता. तेथील अतिक्रमणे काढली जात असतानाच खासदार उदयनराजे भोसले त्या ठिकाणी आले. ह्यआधी नोकऱ्या द्या, मग खुशाल अतिक्रमणे पाडा. त्यानंतरही अतिक्रमण पाडण्याचा कोणी प्रयत्न कराल तर गाठ माज्याशी आहे,ह्ण असे बजावत मोहीम थांविण्यास सांगितले. त्यानंतर वरिष्ठाचे पुढील आदेश मिळेपर्यंत मोहीम स्थगित करण्यात आली. (प्रतिनिधी)