जिल्ह्यातील साडे अकरा लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:40+5:302021-08-28T04:43:40+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सात महिन्यांपासून सुरू असून, गेल्या काही दिवसांत या मोहिमेला वेग आला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ...

The first dose of the vaccine to 11.5 lakh citizens in the district | जिल्ह्यातील साडे अकरा लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस

जिल्ह्यातील साडे अकरा लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सात महिन्यांपासून सुरू असून, गेल्या काही दिवसांत या मोहिमेला वेग आला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ११ लाख ६७ हजार ७५६ नागरिकांना पहिला तर ५ लाखांहून अधिक लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि काही खासगी रुग्णालयांत ही सुविधा सुरू झाली. शासकीय केंद्रांत लस मोफत देण्यात येत आहे.

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, ही लसीकरण मोहीम बारगळली. काही दिवसांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. त्याचबरोबर सवा नऊ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी आहेत.

जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ३०० हून अधिक केंद्रांत सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात. आतापर्यंत जिल्ह्याला शासकीयसाठी कोरोना लसीचे १५ लाख ८९ हजार ६२० डोस मिळालेले आहेत.

पॉइंटर :

जिल्ह्यातील लसीकरण स्थिती

एकूण लसीचे डोस दिले - १६६९३५३ (शासकीय, खासगी)

- पहिला डोस ११६७७५६

- दुसरा डोस ५०१६९७

६० वर्षांवरील नागरिक

- प्रथम डोस ३३३२२५

- दुसरा डोस १९७५४६

४५ ते ५९ वयोगट

- पहिला डोस ३७६३८०

- दुसरा डोस २०२४२०

१८ ते ४४ वयोगट

- पहिला डोस ३७०१४१

- दुसरा डोस ३५३०७

...............................................................

Web Title: The first dose of the vaccine to 11.5 lakh citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.