शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

पहिल्या बहराची स्ट्रॉबेरी बाजारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:24 IST

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारी पहिल्या बहराची स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. महाबळेश्वर तालुका स्ट्रॉबेरी हब ...

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारी पहिल्या बहराची स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. महाबळेश्वर तालुका स्ट्रॉबेरी हब म्हणून देश-विदेशात ओळखला जातो. देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पन्नात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा ८५ टक्के वाटा आहे. तालुक्यात साडेतीन हजार एकर क्षेत्रांवर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे.भिलारे, कासवंड, मेटगुताड, अवकाळी, भोसे, दानवली, पांगरी, तायघट, पाचगणी तसेच कमी-अधिक प्रमाणात दांडेघर, गोडवली, खिंगर या ठिकाणचे शेतकरीही मुख्यत: स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहेत. स्ट्रॉबेरी हंगामाची सुरुवात आॅक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये होते. यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे मदर प्लांट रोपांना कमकुवतपणा, रनर उशिरा आल्याने लागवड लांबणीवर गेली. त्यामुळे स्ट्रॉबेरी बाजारात उशिरा येणार होती. मदर प्लांटची रोपे परदेशातून मे-जूनच्या मध्यावर आयात केली जाते. त्यापासून पुन्हा रोपनिर्मिती केली जाते. त्यापासून तयार झालेले रनर प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रोपं तयार करून घेतली जातात. त्याची लागवड सप्टेंबरमध्ये केली जाते तर टिश्यू व कल्चर पद्धतीचं रोपं स्ट्रॉबेरीच्या बियांपासून एकदाच तयार करून ते सरळ लागवडीसाठी कॅलिफोर्नियामधून आॅगस्टमध्ये उपलब्ध केली जाते. त्याला फळेही एक महिना अगोदर म्हणजे आॅक्टोबरमध्ये येतात. मदर प्लांट रोपांची लागवड सप्टेंबरमध्ये केल्याने नोव्हेंबरमध्ये फळे येतात.अलीकडे टिश्यू व कल्चर पद्धतीच्या रोपांना जास्त पसंती दिली जात आहे. नवीन रोपे तयार करण्यासाठी वाई, जावळी या ठिकाणी शेती खंडाने द्यावी लागते. मजुरी, औषध खर्च एवढं सर्व करून हवामानाने साथ दिली नाही तर रोपांवर रोग पडणे तसेच रोपे कोमेजणे अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच टिश्यू व कल्चर पद्धतीमुळे सरळ लागवड व एक महिन्यात अगोदर उत्पन्न घेता येत असल्याने यावर्षी टिश्यू व कल्चरच्या रोपांमुळे आॅक्टोबरच्या मध्यावरच स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाले. बाजारात अडीचशे ते तीनशे रुपये किलो दर सुरू आहे, त्यामुळे पहिल्या बहराची स्ट्रॉबेरी उत्पादन घेणाºयास चांगला आर्थिक फायदा होतो. मदर प्लांट रोपांची लागण झालेल्या रोपांच्या अगोदर स्ट्रॉबेरी फळ बाजारात उपलब्ध होतात.लालचुटूकची पर्यटकांना भुरळसध्या स्ट्रॉबेरीचा भाव भलताच वाढला आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांकडून व्यावसायिक अडीचशे ते तीनशे रुपये किलो दराने खरेदी करून पर्यटकांना पाचशे ते सहाशे रुपये किलो दराने त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला जास्त पसंती मिळत आहे. फिरायला येणाºयांना महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी भुरळ पाडत आहे.