पहिल्याच दिवशी २०५ पर्यटकांची कास पुष्प पठाराला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:41 IST2021-08-27T04:41:58+5:302021-08-27T04:41:58+5:30

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होत असल्याने पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. कोरोना ...

On the first day itself, 205 tourists visit Kas Pushpa Plateau | पहिल्याच दिवशी २०५ पर्यटकांची कास पुष्प पठाराला भेट

पहिल्याच दिवशी २०५ पर्यटकांची कास पुष्प पठाराला भेट

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होत असल्याने पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. कोरोना संकटामुळे गेल्यावर्षी बंद असलेले तसेच अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्प पठारावर रंगीबेरंगी फुलांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने बुधवारपासून हंगामाची अधिकृत सुरुवात केली. पहिल्याच दिवशी २०५ पर्यटकांनी भेट दिली. हंगामाचे उद्घाटन अध्यक्ष मारुती चिकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत, सर्व समिती सदस्य, वनपाल नीलेश रजपूत, निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे, वनरक्षक स्नेहल शिंगाडे, वनमजूर राजाराम जाधव, सुरक्षा कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाला. फुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण होत असल्याने कास पठारावर तीस ते पस्तीस प्रकारची फुले तुरळक प्रमाणात बहरून काही दिवसातच गालिचे पहावयास मिळणार आहेत. पर्यटकांना सुरक्षितता व सुख-सुविधा देण्यासाठी वनविभाग व कार्यकारिणी समितीकडून सुरक्षारक्षक व गाइडची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या पठारावर अबोलिमा, रानमहुरी, टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, कापरू, अभाळी, मंजिरी, भुईकारवी, सोनकी या फुलांना तुरळक स्वरूपात बहर आला आहे. पठारावरील फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत.

पठारावरील चवर, कुमुदिनी फुलांना चांगल्या प्रकारे बहर आला असून, उर्वरित फुलेही बहरण्यास सुरुवात झाली आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पहावयास मिळत आहे. वेळोवेळी नियम बदलत असल्याने पाच वर्षांपासून पुढे सर्व वयोगटासाठी सर्वांना शंभर रुपये प्रवेश शुल्क लागू पडेल, अशी माहिती देण्यात आली.

कोट

पठारावर १४० जणांना रोजगार उपलब्ध होत आहे. त्यापैकी वीस महिला स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. वनसंपदेचे संरक्षण, पर्यटकांना सोयीसुविधा, स्थानिकांना रोजगार या गोष्टी केंद्रबिंदू मानून समितीचे कार्य सुरू आहे. फुले पाहत असताना पर्यटकांनी येथील दुर्मीळ फुलांची काळजी घ्यावी.

- मारुती चिकणे,

अध्यक्ष, कास पठार कार्यकारिणी समिती

कोट

दरवर्षी आम्ही कास पठाराला भेट देतो. येथील वातावरण सुंदर असून, सध्या तुरळक फुले दिसत आहेत. पर्यटनास अनुकूल असे वातावरण आहे. येत्या काही दिवसात आणखी फुले बहरलेली पहावयास मिळतील.

- स्नेहा जोशी,

पर्यटक, सांगली

चौकट

कामात सुलभपणा

हंगामापूर्वी २३ ऑगस्टला कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या याविषयी स्वयंसेवकांना प्रशिक्षण वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी, अध्यक्ष मारुती चिकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत, माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव, बजरंग कदम, समिती सदस्य गोविंद बदापुरे, ज्ञानेश्वर आखाडे, सचिव नीलेश रजपूत, श्रीरंग शिंदे यांनी दिले. यामुळे नियोजनपूर्वक कामात सुलभपणा दिसून येत होती.

फोटो

२६कास

कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. (छाया : सागर चव्हाण)

Web Title: On the first day itself, 205 tourists visit Kas Pushpa Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.