भक्ती शिर्के पखवाज वादनात देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:57+5:302021-02-06T05:12:57+5:30
राष्ट्रीय कला उत्सव २०२०-२१ मध्ये पखवाज-मृदुंग वादन ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या ...

भक्ती शिर्के पखवाज वादनात देशात प्रथम
राष्ट्रीय कला उत्सव २०२०-२१ मध्ये पखवाज-मृदुंग वादन ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील तब्बल ३४ विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटण तालुक्यातील अडूळ या छोट्याशा गावातील भक्ती विजयकुमार शिर्के या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने इतर राज्यातील सर्व स्पर्धकांवर मात करून पखवाज या पारंपरिक वाद्याचे सादरीकरण केले आणि सर्वांनाच मंत्रमुग्ध करून देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळवला होता.
लहानपणापासून जिद्दी व मेहनती वृत्ती असलेल्या भक्तीने सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर व गुरुवर्य घोरपडे व आई, वडील यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त केले आहे. वडील विजयकुमार शिर्के हे येराड हायस्कूलला मुख्याध्यापक असून त्यांना संगीत व अध्यात्माची आवड आहे. भाऊ अजय हादेखील उत्तम संगीतवाद्यक आहे. त्यामुळे लहानपणापासूनच घरातून बाळकडू मिळाले आहे.
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, येडोबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद साळुंखे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
फोटो : ०४भक्ती शिर्के