Firing on the wind in front of the sisters ... | बहिणींसमोरच पवनवर गोळीबार...
बहिणींसमोरच पवनवर गोळीबार...

कºहाड : रस्त्यावरील गोंधळ ऐकून टीव्ही पाहत असलेला पवन घराबाहेर आला. मात्र, त्याला पाहताच हल्लेखोरांनी पिस्तूल रोखले. अंदाधुंद गोळीबार करीतच ते त्याच्या दिशेने धावले. या गोळीबारात तब्बल अकरा गोळ्या पवनला लागल्या आणि क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. हा सगळा प्रकार त्याच्या दोन बहिणींसमोरच झाला. भावाची अवस्था, प्रचंड गोळीबार आणि उडालेल्या गोंधळामुळे त्या दोघीही मुर्छित झाल्या.
कºहाडातील महात्मा फुले नगरमध्ये येताच संशयित शिवराज इंगवले याने त्याच्या हातातील रिव्हॉल्व्हरने हवेत गोळी झाडली. तसेच पवनचे नाव घेऊन सर्व संशयित मोठ-मोठ्याने ओरडत होते. हा गोंधळ ऐकून घरात टीव्ही पाहत बसलेला पवन घराबाहेर आला. त्याला पाहताच संशयित जुनेद शेख, समीर मुजावर, मजहर मुजावर, शिवराज इंगवले, हैदर मुल्ला त्याच्या दिशेने धावले. त्यावेळी पवनने नजीकच असलेल्या तांबोळी पोहा मिलच्या पायरीवरून उडी मारून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न
केला. मात्र, संशयितांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला.
पवन घरातून बाहेर धावल्याने त्याच्या पाठोपाठ त्याच्या दोन्ही बहिणी पूजा व काजलही बाहेर धावत आल्या. काय घडतंय, हे समजण्यापूर्वीच त्यांच्या डोळ्यासमोरच संशयितांनी पवनवर गोळ्या झाडल्या. त्यापैकी अनेक गोळ्या पवनला लागल्या आणि तो खाली कोसळला. पूजा व काजल मोठ्याने ओरडल्या. मात्र, त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करीत संशयितांनी गोळीबार करून कार व दुचाकीवरून तेथून पळ काढला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवनला पाहिल्यानंतर पूजा व काजल बेशुद्ध झाल्या. तसेच गोळीबार सुरू असताना चौकात उभे असलेले उदय सातपुते आणि महेश दुबळे हेही घाबरले. गोळीबार सुरू असताना ते तेथून काही अंतरावर गेले. तसेच संशयित निघून गेल्यानंतर ते पवनकडे धावले. त्यांनी त्याला त्वरित कृष्णा भोसले यांच्या रिक्षातून सह्याद्री रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत पवनचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटना समजल्यानंतर शहरातील दुकाने बंद ठेवली

संशयिताच्या घरावर दगडफेक
मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर संतप्त जमाव मंगळवार पेठमार्गे बुधवार पेठेकडे जात होता. यावेळी कडक पोलीस बंदोबस्तही तैनात होता. मात्र, तरीही संतप्त जमावाने एका संशयिताच्या घरावर दगडफेक करून घराच्या काचा फोडल्या. तसेच मंगळवार पेठ परिसरातील काही दुकाने व वाहनांवरही यावेळी दगडफेक करण्यात आली.
दुचाकी, रिक्षा पेटवली...
पवनचा मृत्यू झाल्याची माहिती शहरात पसरल्यानंतर पहाटेच्या सुमारास शेकडो युवक बुधवार पेठेत जमा झाले. त्याठिकाणी जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच काही युवक प्रभात थिएटरपासून चालत बापूजी साळुंखे पुतळ्यानजीक गेले. चर्चसमोर उभी असलेली दुचाकी व एक रिक्षा युवकांनी जाळली.

Web Title: Firing on the wind in front of the sisters ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.