शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून घटना; जखमीवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 00:50 IST

खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या.

सातारा:

येथील राजवाड्यावर रात्री अकराच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले  यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. हा वाद पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील राजवाडा परिसरामध्ये खासदार उदयनराजे समर्थक आप्पा मांढरे हे बोलत उभे राहिले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहेत. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीस व सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मांढरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजवाडा जवळील गोल बागेजवळ ही घटना घडली असून तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले आहे. मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सातारा शहराची नाकाबंदी सुद्धा केली आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर