शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ येथे गोळीबार, एक युवक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 22:50 IST

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील शासकीय विश्रामगृह समोर असणाऱ्या मेनरोडवर पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका 40 वर्षीय युवकावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.यामध्ये रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (रा.व्हाईट हाऊस,बाजारपेठ,शिरवळ ता.खंडाळा) असे गोळीबारात किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान,हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर दुचाकीवरून पलायन केले आहे. हि घटना मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.12 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ ता.खंडाळा येथील रियाज उर्फ मिन्या शेख हा शिरवळ येथे बाजारपेठ याठिकाणी कुटुंबियांसमवेत राहण्याकरिता आहे.दरम्यान,रियाज उर्फ मिन्या शेख हा मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान मेनरोडवर असणाऱ्या शासकीय विश्रामगृह याठिकाणी दुचाकी (क्रं-एमएच-12-टीई-4498) वरून उतरत एका मित्राशी बोलत होते. सायंकाळी 5.12 वाजण्याच्या दरम्यान बाजारपेठमधून दुचाकीवरून आलेल्या दोन हळखोरांपैकी एक युवक उतरत मिन्या उर्फ रियाज शेख यांच्या दिशेने आला. अचानकपणे गोळीबार करत असताना मिन्या उर्फ रियाज शेख याने पाहिल्यानंतर हल्लेखोर युवकाबरोबर झटापट झाली. गोळी सुटत रियाज उर्फ मिन्या शेख याच्या उजव्या हाताला गोळी लागून जखमी झाला.

मिन्या उर्फ रियाज शेख याने घटनास्थळावरून पलायन केले. हल्लेखोर युवकाने मिन्या उर्फ रियाज शेख याचा काही अंतरावर पाठलाग केला. त्याच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी हल्लेखोरांनी गोळीबार नंतर दुचाकीवरून पलायन केले आहे. यावेळी घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित हल्लेखोरांनी 2 गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डॉ.वैशाली कडुकर,शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्यासह शिरवळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी व फॉरेन्सिक टिमने धाव घेतली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अन..शाळकरी मुली वाचल्या..!

शिरवळ येथे युवकावर गोळीबार होत असताना सायंकाळी शालेय विद्यार्थी घटनास्थळावरून जात होते.दरम्यान,अचानकपणे घडलेल्या घटनेमध्ये जर चुकून शालेय विद्यार्थ्याला गोळी लागली असती तर असा प्रश्न निर्माण होत असून विविध चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली न्हवती अशी म्हणण्याची वेळ सध्या शिरवळकर नागरिकांवर आली आहे.आरोपी निष्पन्न.घटना सीसीटीव्हीमध्ये कैद शिरवळ येथे युवकावर गोळीबार झाल्यानंतर खळबळ उडाली असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने शिरवळ पोलीसांनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यादृष्टीने तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे ?यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी