आगीत शेळी ठार; गवताच्या गंजी खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:42+5:302021-02-18T05:14:42+5:30
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चाफळ विभागातील कांबळेवाडी-धायटी येथील कृष्णत ऊर्फ पप्पू पांडुरंग कांबळे यांच्या मालकीच्या जनावरांच्या शेडला बुधवारी दुपारी साडेचार ...

आगीत शेळी ठार; गवताच्या गंजी खाक
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चाफळ विभागातील कांबळेवाडी-धायटी येथील कृष्णत ऊर्फ पप्पू पांडुरंग कांबळे यांच्या मालकीच्या जनावरांच्या शेडला बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीत कडबा व गवताच्या दोन गंजी खाक झाल्या. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशींच्या दावणी कापून काढल्याने त्या सुदैवाने बचावल्या. आगीची तीव्रता जास्त असल्याने एक बकरी जागीच ठार झाली, तर शेळी गंभीर जखमी झाली. अग्निशामक गाडीला पाचारण करण्यात आले होते. मात्र, गाडी येईपर्यंत गंजी खाक झाल्या. त्यामुळे या आगीत कांबळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो : १७केआरडी०६
कॅप्शन : कांबळेवाडी-धायटी, ता. पाटण येथे आगीत गवताच्या गंजी जळून खाक झाल्या.