गुरसाळे येथे आगीत शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:34+5:302021-04-06T04:38:34+5:30

औंध : गुरसाळे (ता. खटाव) येथील डॉ. प्रशांत लक्ष्मण गोडसे यांच्या शेतात अचानक आग लागून सुमारे एक लाख २५ ...

Fire at Gursale damages agriculture | गुरसाळे येथे आगीत शेतीचे नुकसान

गुरसाळे येथे आगीत शेतीचे नुकसान

औंध : गुरसाळे (ता. खटाव) येथील डॉ. प्रशांत लक्ष्मण गोडसे यांच्या शेतात अचानक आग लागून सुमारे एक लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, यामध्ये प्रामुख्याने केळीची रोपे, जांभळाची झाडे, ठिबकचे नुकसान झाल्याने मोठा फटका बसला आहे.

गुरसाळे गावच्या हद्दीतील गट नं. १६१५ मध्ये वडूज येथील डॉ. प्रशांत गोडसे यांच्या मालकीची शेतजमीन आहे. या जमिनीलगत शेतातील गवत पेटविले होते. त्या गवताची आग शेजारील गोडसे यांच्या शेतापर्यंत पोहोचली. या आगीत एक एकर क्षेत्रातील ठिबक,२८० फूट बोअर गोटा पाइप, ७०० फूट केबल, एक हजार केळीची रोपे, जांभळीची झाडे तर तोडलेल्या उसाच्या काही मोळ्या जळून खाक झाल्या, तर नारळाच्या रोपांनाही आगीची झळ लागली आहे. या आगीमुळे डॉ. गोडसे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी साळुंखे, कृषी सहायक भुजबळ यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सरपंच हसन शिकलगार, पोलीस पाटील नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य सागर झेंडे व मान्यवर उपस्थित होते.

०५औंध

फोटो:- गुरसाळे येथील डॉ. प्रशांत गोडसे यांच्या शेतातील आगीने जळालेल्या फळबागेची पाहणी करण्यात आली. (छाया : रशीद शेख)

Web Title: Fire at Gursale damages agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.