शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

फटाक्यानं रोपं जळाली.. वधुपित्यानं पुन्हा लावली!-- लोकमत विशेष

By admin | Updated: April 20, 2016 00:23 IST

लग्नाच्या वरातीतील प्रताप : संतप्त सातारकर पोलिस ठाण्यात पोहोचताच वऱ्हाडी मंडळीकडून तातडीनं चूक दुरुस्त :

सातारा : लग्नाच्या वरातीतील उत्साही वऱ्हाडी मंडळींनी लावलेल्या फटाक्यांमुळे रस्तादुभाजकातील शंभर रोपं जळून खाक झाली. हे पाहून हळहळलेल्या काही सर्वसामान्य सातारकरांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथं संबंधित वऱ्हाडी मंडळींना बोलावून घेताच त्यांनी जळालेली सर्व रोपं परत लावून देण्याचं कबूल केलं. लगेच रस्तादुभाजकातील जळालेली रोपं बाजूला काढून त्याठिकाणी नवी रोपं लावण्यात वधुपित्यानंच पुढाकार घेतला.एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशी घटना सातारा शहरातील विसावा नाका परिसरात घडली. राष्ट्रीय महामार्गापासून ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्तादुभाजकात नुकतीच काही रोपं लावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुष्कर मंगल कार्यालयात लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वरात निघताना या दुभाजकातच फटाक्याची भलीमोठी माळ पेटविली. यात शंभरपेक्षाही जास्त नाजूक रोपं अक्षरश: जळून खाक झाली. हे पाहून आजूबाजूचे नागरिक हळहळले. यातीलच एक उद्योजक प्रशांत मोदी यांना राहवले नाही. त्यांनी थेट शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनीही सातारकरांच्या भावना समजून घेऊन तत्काळ पुष्कर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाला बोलावून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो, याची जाणीव करून देताच संबंधित व्यवस्थापकानेही तातडीने संबंधित वऱ्हाडी मंडळींशी संपर्क साधला.रिझर्व्ह बँकेत कामाला असलेले वधुपिता सुभाष फडतरे यांनी पोलिस ठाण्यात चूक कबूल केली अन् जळालेल्या रोपांची नुकसानभरपाई करून देण्यासाठी याच ठिकाणी दुप्पट रोपं लावण्याचा शब्द दिला. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी रोपं लावण्यास प्रारंभ झाला. यावेळी प्रशांत मोदी, आशिष जेऊरकर, विपुल मोरे, प्रशांत पवार, अमित कांबळे, जावेद डांगे अन् सारंग गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाटल्याही जळून खाक..विसावा नाका परिसरातील रस्तादुभाजकात लावण्यात आलेली रोपं जगविण्यासाठी ‘रयत पॅरेंटस्’ परिवाराने याठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचीही सोय केली होती. या बाटल्याही फटाक्यांच्या उष्णतेमुळे जळून खाक झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा याठिकाणी बाटल्या लावण्यासाठी ही मंडळी मोठ्या जिद्दीने कामाला लागली आहेत. विशेष म्हणजे, पुष्कर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनानेही या परिसरातील रोपांना स्वत:हून रोज पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.पोलिस अधिकाऱ्यांची भावनिकताखून, मारामाऱ्यांसारख्या गंभीर प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिस खाते व्यवस्थित पुढाकार घेत नाही, अशी तक्रार बऱ्याच वेळा केली जाते. मात्र रोपांसारख्या छोट्याशा भावनिक प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी ज्या पद्धतीने संबंधितांना कामाला लावले, ते पाहून पोलिस खात्यातील भावनिकता अद्याप जिवंत असल्याचाच अनुभव सातारकरांना आला.