शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

शिंदेवाडीत दरवाजे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 14:49 IST

Fire Satara- सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला शिंदेवाडी (कटगुण, ता. खटाव) येथील माळरानावर असलेल्या डुरीयम डोअर्स इंडस्ट्रीज कंपनीला रविवारी सकाळी सात वाजता आग लागली. लॅमीनेटेड दरवाजे उत्पादित करणारी ही कंपनी असून या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशिंदेवाडीत दरवाजे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आगकोट्यवधींचे नुकसान

पुसेगाव : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला शिंदेवाडी (कटगुण, ता. खटाव) येथील माळरानावर असलेल्या डुरीयम डोअर्स इंडस्ट्रीज कंपनीला रविवारी सकाळी सात वाजता आग लागली. लॅमीनेटेड दरवाजे उत्पादित करणारी ही कंपनी असून या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.शिंदेवाडी आणि निढळ या दोन्ही गावाच्या मधोमधच ही दरवाजे बनविणारी कंपनी आहे. दरम्यान ही आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी कंपनीकडे धाव घेतली. तसेच कंपनीचे मालक वसंत पटेल (रा. पुसेगाव) यांना कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाशी वेळेत संपर्क न झाल्यामुळे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी उशीर झाला. सुरुवातीला उपाययोजना म्हणून पटेल यांनी स्थानिक पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी, मोठ्या प्रमाणावर लाकूड तसेच प्लास्टिक जळत असल्यामुळे कंपनीतून आगीचे डोंब निघत होते. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्लायवूड दरवाजे, लाकडी साहित्य, मशनरी खाक झाली आहे. तसेच ही आग नेमकी लागली कशामुळे याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी पुसेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

टॅग्स :fireआगSatara areaसातारा परिसर