शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

साताऱ्यातील वडगाव हवेली येथे जलवाहिनीच्या गोदामाला आग, योजनेचे काम सुरू होण्यापूर्वीच दुर्घटना; कोट्यवधीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 16:27 IST

आगीचे कारण अद्याप अस्पष्टच

संतोष खांबेवडगाव हवेली : कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे जलजीवन मिशनअंतर्गत होणारे चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध केलेल्या जलवाहिन्याच्या साठ्याला काल, शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. याआगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.वडगाव येथील ग्रामपंचायतीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने सुमारे ११ कोटी रकमेची चोवीस बाय सात योजनेचे काम काही दिवसांतच सुरू होणार होते. यासाठी लागणाऱ्या एचडीपी प्रकारच्या विविध आकाराच्या जलवाहिन्या गेली महिनाभरापूर्वी या ठिकाणी ठेवल्या होत्या. येथील ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारील बाजार पटांगणावर जलवाहिन्यांचा साठा केला होता. शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली.आग इतकी प्रचंड प्रमाणात होती की काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी ग्रामपंचायतीकडून कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल व कऱ्हाड नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. या अग्निशमन यंत्रणा आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या, परंतु आग आटोक्यात येत नव्हती. सुमारे एक ते दीड तासाने आग विझविण्यात यश आले.जलवाहिनी गोदामाशेजारीच जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत आहे. या ठिकाणी शाळा सुरू नसली तरी काही खोल्यांमध्ये शालेय साहित्य ठेवण्यात आले होते. आगीमध्ये या शालेय साहित्याचेही नुकसान झाले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. आगीबाबत शनिवारी सकाळी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग