शॉर्टसर्किटमुळे रुग्णवाहिकेला आग खाक

By Admin | Updated: January 9, 2017 22:46 IST2017-01-09T22:46:45+5:302017-01-09T22:46:45+5:30

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाला सोडून परतत असलेली १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत शॉर्टसर्कीट झाला.

A fire at the ambulance due to the short circuit | शॉर्टसर्किटमुळे रुग्णवाहिकेला आग खाक

शॉर्टसर्किटमुळे रुग्णवाहिकेला आग खाक

>ऑनलाइन लोकमत
कोयनानगर (सातारा), दि. 09 -  पाटण तालुक्यातील मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाला सोडून परतत असलेली १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत शॉर्टसर्कीट झाला. यामध्ये रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली. ही रुग्णवाहिका हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राची होती. 
ही घटना क-हाड-चिपळूण राज्यमार्गावरील दास्तान गावाजवळील बंद टोलनाक्यावर सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. त्यावेळी रुग्णवाहिकेत फक्त चालक होता. त्याने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने अनर्थ टळला.

Web Title: A fire at the ambulance due to the short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.