पुसेगावात विनाकारण फिरणाऱ्यांकडून ७५ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:01+5:302021-06-05T04:28:01+5:30
पुसेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव शहर व परिसरातील काही बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. पुसेगाव पोलीस ...

पुसेगावात विनाकारण फिरणाऱ्यांकडून ७५ हजारांचा दंड वसूल
पुसेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव शहर व परिसरातील काही बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली.
पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच किराणा दुकानदार, विनापरवाना वाहतूक करणाऱ्या तीन खासगी प्रवासी वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ७५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
छत्रपती शिवाजी चौकात मोकाट फिरणाऱ्या चाळीस जणांची जागेवरच कोरोना चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यात एकही कोरोनाबाधित नाही.
पुसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या खटाव, निढळ, बुध, ललगुण, डिस्कळ, विसापूर आदी या गावांमध्ये कारवाई आली.
सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, वाहतूक पोलीस किरण देशमुख, सुनील अब्दागिरे, ज्ञानेश्वर यादव यांनी ही कारवाई केली. यावेेळी पुसेगाव ग्रामपंचायत, ग्रामदक्षता समिती व आरोग्य विभाग यांनी सहकार्य केले.
चौकट:
नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे
लॉकडाऊन काळात पुसेगाव, खटाव, बुध, निढळ व परिसरासह पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिला आहे.
फोटो ०४पुसेगाव-कोरोना
पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात विनाकारण फिरणाऱ्या चाळीस जणांची कोरोना चाचणी जागेवरच करण्यात आली. (छाया : केशव जाधव)