विनामास्क कारवाईत २० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:21+5:302021-04-06T04:38:21+5:30
शिवथर : आरफळ फाटा (ता. सातारा) येथील मंगल कार्यालयातील आलेल्या वऱ्हाडीवर विनामास्कप्रकरणी कारवाई करत वडूथ येथील मंडल अधिकाऱ्यांनी वीस ...

विनामास्क कारवाईत २० हजारांचा दंड वसूल
शिवथर : आरफळ फाटा (ता. सातारा) येथील मंगल कार्यालयातील आलेल्या वऱ्हाडीवर विनामास्कप्रकरणी कारवाई करत वडूथ येथील मंडल अधिकाऱ्यांनी वीस हजार रुपये एवढा दंड वसूल केला.
यावेळी मंडलाधिकारी तसेच गावकामगार तलाठी यांनी लग्नसमारंभात पाहणी केली असता येथील त्यांना कुंदन मंगल कार्यालय व साई मंगल कार्यालय आरफळ फाटा येथील दोन मंगल कार्यालयांत आलेल्या वऱ्हाडी लोकांमध्ये काही लोक विनामास्क आढळले. यावेळी मंडलाधिकारी सागर कारंडे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चाळीस लोकांवर कारवाई करत प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे सुमारे वीस हजार एवढा दंड वसूल केला केला. या कारवाईत शिवथरचे तलाठी विजय शिंगटे, आरळे येथील तलाठी गणेश भगत, पाटखळ तलाठी यांनी या कारवाईवेळी सहभाग घेतला.