शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कास, शहापूर योजनेची जोडणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:02 IST

सातारा शहराला उरमोडी धरणातील पाणी शहापूर योजनेद्वारे आणि कास धरणातील पाणी कास पाईपलाईनद्वारे पुरविले जात होते. या दोन्ही पाईपलाईनद्वारे वेगवेगळ््या भागाला पाणीपुरवठा केला जात होता. आता दोन्ही पाईपलाईन एकत्रित जोडल्यामुळे शहापूरचे पाणी कास पाईपलाईनद्वारे मिळणाऱ्या लोकांनाही उपलब्ध होणार आहे. या कामाची जोडणी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.

ठळक मुद्देकास, शहापूर योजनेची जोडणी अंतिम टप्प्यातशहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस कनेक्शन

सातारा: शहराला उरमोडी धरणातील पाणी शहापूर योजनेद्वारे आणि कास धरणातील पाणी कास पाईपलाईनद्वारे पुरविले जात होते. या दोन्ही पाईपलाईनद्वारे वेगवेगळ््या भागाला पाणीपुरवठा केला जात होता.

आता दोन्ही पाईपलाईन एकत्रित जोडल्यामुळे शहापूरचे पाणी कास पाईपलाईनद्वारे मिळणाऱ्या लोकांनाही उपलब्ध होणार आहे. या कामाची जोडणी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.भविष्यातील पाणी टंचाई सदृश परिस्थितीचा विचार करता कास माध्यमातून पाणी पुरवठा होत असणाऱ्या भागास पर्यायी स्त्रोत उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यानुसार गुरुकुल टाकी व कात्रेवाडा टाकीवरून कास माध्यमातून पाणी वितरीत करण्यात येत आहे. त्या भागास गरज पडल्यास शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस कनेक्शन करण्यात आले.याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे. बोगदा परिसरामध्ये जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कास धरणातील पाणी पातळी यदाकदाचित आणखी खालावल्यास शहापूर योजनेतून गुरूकूल टाकी व कात्रेवाडा टाकीवरून पाणी वितरित करणे शक्य होणार आहे.

या कामाची पहणी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकामचे माजी सभापती किशोर शिंदे, अभियंता दीपक राऊत आदींनी केली. क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने चाचणी घेण्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Kas Patharकास पठारWaterपाणीSatara areaसातारा परिसर