शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST2021-07-20T04:27:07+5:302021-07-20T04:27:07+5:30
सातारा : सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ...

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी
सातारा : सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीवर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. सर्व महाविद्यालयांना २०२०/२१ शैक्षणिक वर्षातील आपल्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सातारा समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
..............................
बकरी ईददिवशी मद्यविक्रीवर बंदी
सातारा : बकरी ईद या सणाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ मधील कलम १४२(१) मधील तरतुदीनुसार दि. २१ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व देशी दारू किरकोळ विक्री (सीएल-३), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२), विदेशी मद्य विक्री (एफएल-२), परवानाकक्ष (एफएल-३) बिअरबार ( फॉर्म ई ) या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ व अंतर्गत असलेल्या नियमान्वये योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. व अनुज्ञप्ती बंदच्या कालावधीची नुकसान भरपाई दिली जाणार नाही, यांची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.