वाळू माफियावर पत्रकार संरक्षणचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:25 AM2021-06-21T04:25:38+5:302021-06-21T04:25:38+5:30

फलटण : जिंती (ता.फलटण) गावचे पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ करूनही पत्रकार संरक्षण ...

File a journalist protection case against the sand mafia | वाळू माफियावर पत्रकार संरक्षणचा गुन्हा दाखल करा

वाळू माफियावर पत्रकार संरक्षणचा गुन्हा दाखल करा

googlenewsNext

फलटण : जिंती (ता.फलटण) गावचे पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ करूनही पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकत्र येत, गुन्हा दाखल न झाल्यास दि. २२ पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार प्रशांत रणवरे हे बातमी करण्यासाठी गेले होते. यानंतर, ते जिंती गावाच्या बस स्टँडवर थांबले असता, प्रमोद रणवरे व इतर दोन वाळू माफियांनी महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना तू वाळू उपसाची माहिती देतो, असे म्हणत जीवे मारण्याची त्यांना धमकी दिली. मात्र, पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

यामुळे फलटण शहर व तालुका पत्रकार यांनी या घटनेच्या निषेध केला. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकत्रित येत संबंधित आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, रमेश आढाव, सुभाष भांबुरे, राजेंद्र भागवत, नसीर शिकलगार, अजय माळवे, दादासाहेब चोरमले, यशवत खलाटे, बाळासाहेब ननावरे, बापुराव जगताप, प्रकाश सस्ते, संजय जमादार, युवराज पवार, शक्ती भोसले, विक्रम चोरमले, चैतन्य रुद्रभटे, प्रसन्न रुद्रभटे, दीपक मदने,विकास अहिवळे, राजेंद्र गोफने, अमोल नाळे, प्रवीण काकडे, उमेश गार्डे, शेखर जगताप, अमिरभाई शेख, उद्धव बोराटे, विठ्ठल शिंदे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

फोटो: पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्याशी चर्चा करताना, फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार.

Web Title: File a journalist protection case against the sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.