हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:46 IST2021-09-14T04:46:30+5:302021-09-14T04:46:30+5:30

सातारा : जावळी तालुक्यातील एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला असून, याप्रकरणी मेढा ...

Fights between hotel staff | हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी

हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी

सातारा : जावळी तालुक्यातील एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला असून, याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश नारायण शिंदे , गणेश धोंडिबा ढेबे, सतीश भगवान ढेबे (सर्व रा. आढाळ, ता. महाबळेश्वर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, जावळी तालुक्यातील रेंगडी येथे एका हाॅटेलमध्ये हे वरील संशयित काम करत आहेत. या हाॅटेलमधील आचारी आकाश सतीशचंद्र उनियाल (वय २३, रा. राजस्थान) याच्यासोबत या संशयितांचा हाॅटेलमधील कपडे परिधान करण्यावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या तिघांनी आचारी आकाश उनियाल याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर उनियाल याने मेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी योगेश शिंदे, गणेश आणि सतीश ढेबे याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास हवालदार एन. एस. जाधव हे करीत आहेत.

Web Title: Fights between hotel staff