पाचगणीत अजूनही टोलचा झोल सुरूच

By Admin | Updated: February 14, 2016 00:43 IST2016-02-14T00:43:18+5:302016-02-14T00:43:18+5:30

सहलींकडून आकारले दीड हजार रुपये

Fifty-five still has toll strings | पाचगणीत अजूनही टोलचा झोल सुरूच

पाचगणीत अजूनही टोलचा झोल सुरूच

महाबळेश्वर : पाचगणी येथील दांडेकर टोल नाक्यावर महाबळेश्वरला येत असलेल्या पर्यटकांची व शालेय सहलीतील विद्यार्थ्यांची टोलच्या नावाखाली सुरू असलेली लूट अजूनही कायम आहे. शनिवारी सिल्वासा येथील मिशनरी शाळेच्या सहलीला या टोल नाक्यावर पंधराशे रुपयांना लुबडण्यात आले. मात्र, शिवसेनेचे विभाग प्रमुख शंकर ढेबे यांनी तातडीने दखल घेऊन लुबडण्यात आलेली रक्कम पुन्हा वसूल करून शाळेच्या शिक्षकाकडे सोपविली.

महाबळेश्वरकडे निघालेल्या पर्यटकांकडून अथवा शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कोणताही प्रवेश कर घेऊ नये, असा नियम आहे. जर पर्यटक वाहनाने आले असतील तर फक्त वाहनाचा बायपासचा कर टोलनाक्यावर वसूल करण्याचा अधिकार ठेकेदारास पालिकेने दिला आहे. परंतु टोल नाक्यावर सर्व नियम पायदळी तुडवून टोल वसूल केला जात आहे.

केंद्र शासित प्रदेश असल्याने सिल्वासामधील खानवेल या गावातील यानमाता इंग्लिश हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना महाबळेश्वरच्या सहलीवर घेऊन तीन बसेस आल्या होत्या. या बसेस थेट महाबळेश्वरला येणार होत्या तशी त्यांनी पाचगणीच्या टोलनाक्यावर कल्पनाही दिली; परंतु टोलनाक्यावर प्रत्येक बसेस कडून ५७० रुपये जबरदस्तीने वसूल करण्यात आले. वास्तविक पाहता प्रत्येक बसचे बायपासचे ७० रुपये असा टोल घेऊन, या बसेस सोडायला हव्या; परंतु टोल नाक्यावर य मिशनरी शाळेच्या शिक्षकाकडून दीड हजार रुपये जबरदस्तीने घेऊन त्यांना लुबडण्यात आले.

शिवसेनेचे विभाग प्रमुख शंकर ढेबे यांना ही बाब कळताच त्यांनी थेट पाचगणी येथील दांडेघर टोल नाका गाठला. यानंतर त्यांनी ठेकेदाराची खरडपट्टी काढली. तेव्हा झाल्या प्रकाराबाबत ठेकेदाराने माफी मागितली व असा प्रकार पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले.

तसेच शाळेच्या शिक्षकाकडून जबरदस्तीने घेतलेले १ हजार ५०० रुपये शंकर ढेबे यांच्याकडे दिले. ढेबे यांनी संबंधित रक्कम शाळेच्या शिक्षिका सुविधा सुहास सुळे यांच्याकडे सुपूर्द केली. (प्रतिनिधी)

Web Title: Fifty-five still has toll strings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.