शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: कार्यक्रमासाठी मंदिरात गेले, चोरट्यांनी पंधरा तोळे सोने लंपास केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:00 IST

श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांचीही मदत

ढेबेवाडी : बंद घराचा दरवाजा उचकटून पंधरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना पवारवाडी कुठरे, ता. पाटण येथे घडली. बुधवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारल्याने खळबळ माजली आहे. ढेबेवाडी पोलिसात या घटनेची नोंद झाली असून, श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पवारवाडी (ता. पाटण) येथे दिनकर कृष्णा पवार पत्नीसमवेत राहतात. पत्नी आजारी असल्याने त्यांना कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे दिनकर पवार हे पंधरा दिवसांपासून घरी एकटेच राहत होते. बुधवारी सायंकाळी येथील श्रीराम मंदिरामध्ये ग्रंथ समाप्तीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी पवार हे घराचा दरवाजा कुलूपबंद करून सायंकाळी सहाच्या सुमारास मंदिरात गेले. तेथील धार्मिक कार्यक्रम आणि जेवण करून रात्री नऊ वाजता घरी परतले. यावेळी घराचा समोरचा दरवाजा उघडला असता पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरातील तिजोरी बघितली असता तिजोरीही उचकटून तिजोरीतील सोने-चांदीसह रोख रक्कमही लंपास केल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शेजारपाजारच्या लोकांना याबाबत माहिती दिली. यावेळी चोरट्यांनी घराच्या पाठीमागचा लाकडी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. पवार यांच्या घराच्या मागे शेती असल्याने चोरट्यांनी शेतातूनच घरात प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेत चोरट्याने मणिमंगळसूत्र, कर्णफुले, चेन यासह काही चांदीच्या वस्तूंवरही डल्ला मारला आहे. तर किरकोळ रोकडही लांबवल्याचे पवार यांनी सांगितले.दरम्यान, या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसांत झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. अमोल डाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तपास करत आहे. यासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली.