शहरं
Join us  
Trending Stories
1
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
2
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
3
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
4
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
5
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
6
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
7
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
8
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
9
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
10
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
11
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
12
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
13
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
14
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
16
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
17
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
18
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
19
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
20
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा तासानंतर जखमी बिबट्याची शोधमोहीम थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:56 IST

leopard SataraNews- जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे- नाल्यांसह २० हेक्टर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही.

ठळक मुद्देनैसर्गिक अधिवासात मार्गस्थ झाल्याचा वनविभागाचा अंदाज २० हेक्टर ऊसक्षेत्राची चाळण

माणिक डोंगरेमलकापूर-जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे- नाल्यांसह २० हेक्टर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही.

दरम्यान, अपघातानंतर उपलब्ध झालेल्या व्हिडिओतील हालचालीवरून त्याला मोठी दुखापत झाली नसल्यामुळे तो नैसर्गिक अधिवासात मार्गस्थ झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पंधरा तासानंतर जखमी बिबट्याची शोधमोहीम थांबवण्यात आली.सिमेंटच्या जंगलात वाढ झाल्यामुळे नैसर्गिक जंगलाचा ऱ्हास होत आहे. परिणामी वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढल्याने भक्षाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जिवावर बेतत आहे. गेल्या दहा दिवसात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू होण्याच्या चार घटना घडल्या आहेत. तर ऊसाच्या रानात मृत अवस्थेत बिबट्या सापल्याच्या घटनाही उघड झाल्या आहेत. तसीच घटना नांदलापूर गावच्या हद्दीत पाचवडफाट्या नजीक हॉटेल समृद्धी समोर मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

अज्ञात वाहनाची धडक बसल्यानंतर अचानक बिबट्याने महामार्गावरच ठिय्या मारला. पंधरा मिनिटातच गर्दी बघून जखमी बिबाट्याने जीव वाचविण्यासाठी महामार्ग ओलांडून कृष्णा नदीकडील ऊसाच्या रानात धूम ठोकली होती. त्या दिवशी रात्रीच्यावेळी अधिकाऱ्यांसह प्राणिमीत्र व नागरिकांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत महामार्गालगत व ऊसाच्या बाजूने शोध घेतला बिबट्या आढळला नाही. साडे बारा वाजता शोधमोहीम थांबवली.

बुधवारी सकाळी पुन्हा साडेसात वाजता शोधमोहीम सुरू केली. बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. या शोधमोहीमेसाठी वन्यजीव सुरक्षाअंतर्गत फॉरेस्ट ट्रँकचा अवलंब करण्यात आला. तर बुधवारी सकाळपासूनच १५ तासात निनाई ओढ्याच्या दुतर्फा २० हेक्टर ऊसक्षेत्रात शोधमोहीम राबवली.

या शोधमोहीमेत कराड वन विभागासह कोल्हापूर येथील विशेष पथकातील अकरा कर्मचाऱ्यांनी ओढे-नाल्यांसह झाडा-झुडपातून व ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. दरम्यान अपघातानंतरचा एक व्हिडिओ वनविभागाला उपलब्ध झाला.

त्या व्हिडिओतील बिबट्याच्या गतीमान हालचालीवरून त्याला मोठी दुखापत झाली नसल्याचे जानवत आहे. त्यामुळे तो नैसर्गिक अधिवासात मार्गस्थ झाल्याचा अंदाज वर्तवत वनविभागाकडून पंधरा तासानंतर जखमी बिबट्याची शोधमोहीम थांबवण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकतामहामार्गाच्या पुर्वेस ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊसतोडणी सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी, ट्रक्टर चालक मालक, ऊसातोडणी मुकादम व मजूरांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे कांही आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा असे अवाहनही वनपाल ए पी सवाखंडे यांनी केले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग