शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग, साताऱ्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: February 22, 2024 12:48 IST

सातारा : एकतर्फी प्रेमातून महिला डाॅक्टरचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा ...

सातारा : एकतर्फी प्रेमातून महिला डाॅक्टरचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.अनुप नंदकुमार गाडे (वय ३८, रा. हॅपी होम सोसायटी, एमआयडीसी, सातारा), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला डाॅक्टर या ३२ वर्षांच्या असून, त्या साताऱ्यातील एका हाॅस्पिटलमध्ये काम करतात. संशयित अनुप गाडे याने एकतर्फी प्रेमातून महिला डाॅक्टरला वारंवार फोन केला. तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांना जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर त्याने शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. ‘फोनवर बोलली नाहीस. माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या घरातील लोकांना जीवंत सोडणार नाही. घर पेटवून देईन,’ अशी धमकी दिली. हा प्रकार १२ डिसेंबर २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत साताऱ्यातील एका हाॅस्पिटलसमोर घडला आहे. दरम्यान, पीडित महिला डाॅक्टरने बुधवार, दि. २१ रोजी सायंकाळी पावणेचार वाजता सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित अनुप गाडे याच्यावर अपहरणसह विनयभंगचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरPoliceपोलिस