आपल्या माणसांनी केलेला सत्कार प्रेरणादायी : हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:59+5:302021-03-09T04:41:59+5:30
खटाव : ‘स्पर्धा कोणतीही असो त्यात मनापासून उतरले तर विजय हा निश्चित मिळतो. जी गोष्ट करावयाची आहे त्याबद्दल मनात ...

आपल्या माणसांनी केलेला सत्कार प्रेरणादायी : हजारे
खटाव : ‘स्पर्धा कोणतीही असो त्यात मनापासून उतरले तर विजय हा निश्चित मिळतो. जी गोष्ट करावयाची आहे त्याबद्दल मनात श्रद्धा, विश्वास व आत्मविश्वास असल्यास यश हे मिळतेच. यश मिळाल्यानंतर कौतुक होत असते परंतु आपल्या माणसाकडून होणारे कौतुक प्रेरणायी असते,’ असे मत श्लोक हजारे याने व्यक्त केले.
श्लोक हजारे याने महाराष्ट्र एअर गन राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. याबद्दल श्लोक हजारे याचा खटावमधील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी तो बोलत होते. यावेळी चेअरमन नम्रता भोसले, व्हाईस चेअरमन संध्या जोशी, संचालिका अंजना भोसले, व्यवस्थापक शबाना काझी, कमल चव्हाण, रंजना सूर्यवंशी, अरुणा कुलकर्णी, मंगल शितोळे, संगीता दरेकर, बाळूताई डेंगळे, सीमा हजारे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बोर्गे, राजेंद्र भोसले, विलास देशमाने, बबन शिंदे, श्रीरंग इंगळे, विलास जगदाळे, तानाजी हजारे, सतीश हजारे उपस्थित होते. (वा.प्र.)
कॅप्शन :
०८खटाव
खटाव येथे सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था खटाव यांच्यावतीने श्लोक हजारे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)