भावना जितकी निर्मळ तेवढा माणूस मोठा

By Admin | Updated: September 14, 2014 23:51 IST2014-09-14T21:41:16+5:302014-09-14T23:51:54+5:30

काडसिध्देश्वर महाराज : अरुण गोडबोले यांच्या ‘सत्तरीचा सातारकर’ ग्रंथाचे प्रकाशन

The feeling is as silly as the man is big | भावना जितकी निर्मळ तेवढा माणूस मोठा

भावना जितकी निर्मळ तेवढा माणूस मोठा

सातारा : ‘कोणताही माणूस हा जन्मताना सर्वसामान्य म्हणूनच जन्माला येतो; पण त्याच्या बुद्धिसामर्थ्यावर तो सामान्य किंवा असामान्य म्हणून घडला जातो. सर्वांचेच पंचभूतातीत शरीर हे एक सारखेच असते; पण आकलन, आचरणावर आपण उत्तम, मध्यम किंवा बुद्धिवान होणार हे ठरत असते. माणूस वयानं, वजनानं मोठा होऊ शकत नाही तर माणसाची भावना जितकी निर्मळ तेवढा तो माणूस मोठा होतो, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. संपत्ती ही संस्कृती नाही तर संस्कृती ही संपत्ती झाली पाहिजे,’ असे उद्गार सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांनी काढले.
अरुण गोडबोले यांच्या सप्तदशपूर्ती निमित्त शाहू कला मंदिर येथे आयोजित स्रेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवाजीराजे भोसले, मारुतीबुवा रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सप्तदशपूर्ती निमित्त मान्यवरांच्या हस्ते अरुण गोडबोले व अनुपमा गोडबोले यांचा पगडी, सन्मानपत्र, शाल, गणेशमूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गोडबोले यांना पहिला ‘रसिक अग्रणी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी ‘सत्तरीचा सातारकर’या ग्रंथाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी योगेश जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘सत्तरीचा सातारकर’ या ग्रंथाचे संपादक मधू नेने यांनी ग्रंथाविषयी माहिती दिली. प्रदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अच्युत गोडाबोले यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The feeling is as silly as the man is big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.