कास तलावात तरुण बुडाल्याची भीती

By Admin | Updated: June 1, 2014 00:58 IST2014-06-01T00:57:35+5:302014-06-01T00:58:26+5:30

रात्री उशिरापर्यंत शोध सुरू

Fear of youth drowning in Kas lake | कास तलावात तरुण बुडाल्याची भीती

कास तलावात तरुण बुडाल्याची भीती

 सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कास तलावात शनिवारी दुपारच्या सुमारास तरुण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत तलावात तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. याबाबत पोलिसांकडून व स्थानिक नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की, सातारा शहराच्या पश्चिमेला सुमारे २५ किमीवर कास तलाव आहे. हा तलाव जावळी तालुक्याच्या हद्दीत आहे. या तलावातून सातारा शहराच्या अनेक भागांना पाणीपुरवठा होतो. शनिवारी दुपारच्या सुमारास सातारा तालुक्यातील अंबानी येथील एक तरुण काहीजणांबरोबर कास तलावाच्या ठिकाणी गेला होता. यावेळी पाय घसरल्याने तो तलावाच्या पाण्यात पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर संबंधित तरुणाचा शोध घेण्यात आला. तसेच पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीस, स्थानिक ग्रामस्थ कास तलावाच्या पाण्यात तरुणाचा शोध घेत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Fear of youth drowning in Kas lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.