साताऱ्यात मुलाकडून वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:45 IST2021-09-15T04:45:35+5:302021-09-15T04:45:35+5:30

सातारा : घरगुती वादातून मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील मंगळवार पेठेत सोमवारी रात्री नऊ वाजता ...

Father murdered by son in Satara | साताऱ्यात मुलाकडून वडिलांचा खून

साताऱ्यात मुलाकडून वडिलांचा खून

सातारा : घरगुती वादातून मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील मंगळवार पेठेत सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलासह आईवर गुन्हा दाखल झाला आहे.

बबन पांडुरंग पवार (वय ५६, रा. मंगळवार पेठ, सातारा), असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बबन पवार आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण का दिले नाही, असे बबन पवार पत्नीला विचारत होते. यातूनच वाद विकोपाला गेला. मुलगा सूरज पवार आणि त्यांची पत्नी वर्षा हे दोघे त्यांच्याशी वाद घालत होते. याचवेळी त्यांचा मुलगा सूरज घरातील चाकू हातात घेऊन आला. वडील बबन पवार यांच्यावर चाकूने वार केले. त्यामुळे बबन पवार हे रक्तबंबाळ होऊन खाली पडले. त्यानंतर त्यांना त्यांचे भाऊ राजू पवार यांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

बबन पवार यांचे भाऊ राजू पवार यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांनी मुलगा सूरज आणि त्यांची पत्नी वर्षा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Father murdered by son in Satara