शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील कास धरणावर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट, धोक्याकडे दुर्लक्ष 

By सचिन काकडे | Updated: October 10, 2023 16:36 IST

कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून गर्दी 

सातारा : कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून या पठाराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत. मात्र, पठाराबरोबरच कास धरणाला भेट देणारे काही हौशी पर्यटक धरणातील पाण्यात जीवघेणे स्टंट करु लागल्याने त्यांना आवारणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सातारा शहराला कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील पाणीसाठ्यात यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेने वाढ करण्यात आल्याने धरण काठोकाठ भरले आहे. या धरणाचा परिसर नयनरम्य असल्याने पठारावर फुले पाहण्यासाठी येणारे बहुतांश पर्यटक धरणालादेखील भेट देत आहेत. मात्र, स्वत:च्या सुरक्षेची तमा न बाळगता धरणातील पाण्यात उभे राहून फोटोशन करणे, दंगा-मस्ती करणे, लहान मुलांना धरणाच्या काठावर, पाण्यात उभे करणे, असे प्रकार सातत्याने केले जात आहेत.वास्तविक धरणाच्या सभोवताचा परिसर हा मातीमुळे गुळगुळीत झाला आहे. सततच्या ओलाव्यामुळे येथील वाटा घसरट्या झाल्या आहेत. काठावरून चालताना चुकून जरी तोल गेला तरी एखादा पर्यटक पाण्यात पडू शकतो. येथे सुरक्षेची कोणतेही साधणे उपलब्ध नाहीत की सुरक्षारक्षक. धरणाच्या सभोवताली तात्पुरत्या स्वरुपात बॅरिकेडिंगदेखील करण्यात आलेले नाही. या गोष्टीची कल्पना असूनही पर्यटक धरणाच्या काठावर जीवघेणे स्टंट करताना दिसून येत आहेत. हा प्रकार गंभीर असून, अतिउत्साही पर्यटकांवर आवर घालणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनDamधरणKas Patharकास पठार