शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

साताऱ्यातील यवतेश्वर येथे दोन कारची भीषण धडक; तरुणी ठार; एक गंभीर

By दत्ता यादव | Updated: July 29, 2023 19:11 IST

एअर बॅग उघडल्या पण.., काही वर्षांपूर्वी वडिलांचे अन् आता मुलीच्याही अपघाती मृत्यूने हळहळ 

सातारा : सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये एका २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातात ठार झालेली तरुणी सातारा नगरपालिकेची कर्मचारी होती.गायत्री दीपक आहेरराव (वय २१, रा. शनिवार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर ओंकार लोखंडे (वय २४, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) याच्यासह अन्य एकजण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ओंकारला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गायत्री आहेरराव ही तरुणी कारमधून कासवरून साताऱ्याकडे येत होती. याचवेळी साताऱ्याकडून कारमधून तीन तरुण कासकडे निघाले होते. या दोन्ही कारची यवतेश्वरजवळ भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या पुढील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात गायत्री आहेरराव या तरुणीच्या डोक्याला तसेच हाता पायाला गंभीर जखम झाली. तर  ओंकार लोखंडे हा सुद्धा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकरचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून गायत्रीला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ओंकार लोखंडे याचीही प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला तातडीने पुणे येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातप्रकरणी अनोळखी कार चालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विशाल मोरे हे अधिक तपास करीत आहेत. एअर बॅग उघडूनही मृत्यू..दोन्ही कारची भीषण धडक झाल्यानंतर एअर बॅग उघडल्या. मात्र, तरी सुद्धा गायत्रीचा मृत्यू झाल्याने पोलिसही अवाक् झाले आहेत. तिने सीट बेल्ट व्यवस्थित लावला होता की नाही, हे तपासानंतरच समजणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली आहेत.गायत्रीच्या वडिलांचाही पूर्वी अपघाती मृत्यूगायत्रीचे वडील दीपक आहेरराव यांचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. त्यानंतर आता त्यांच्या मुलीचाही अपघातात मृत्यू झाल्याने साताऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. गायत्री ही काही वर्षांपूर्वी नगरपालिकेत नोकरीला लागली होती. अशा प्रकारे तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू