उपोषणाला होकार; मंडपास नकार

By Admin | Updated: November 11, 2014 23:21 IST2014-11-11T22:27:13+5:302014-11-11T23:21:25+5:30

उदयनराजेंच्या आंदोलनाकडे लागले सातारकरांचे लक्ष

Fasting; Negation of the mandapa | उपोषणाला होकार; मंडपास नकार

उपोषणाला होकार; मंडपास नकार

सातारा : शहरातील गुंडाराज आणि खंडणीबहाद्दरांच्या मुसक्या आवळण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारपासून पोलीस मुख्यालयासमोरच उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे मंडप उभारण्यात येत होता, मात्र सातारा पोलिसांनी त्यांना मंडप उभारणी मनाई केली.
दरम्यान, मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधत त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. याचवेळी त्यांनी शहरातील काही महाविद्यालयांना भेटी दिल्या आणि विद्यार्थी, प्राध्यापकांशी चर्चा केली आणि परिसरातील गुंडाराजविषयी माहिती घेतली.
दरम्यान, उदयनराजेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलही सतर्क झाले आहे. मंगळवारी पोलीस मुख्यालयाच्या बाजूला मंडप उभारणीचे काम सुरू होते. ही माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ ते काम थांबविण्याच्या सूचना शहर पोलीस ठाण्यात केल्या आणि त्यानुसार मंडप उभारणीचे काम थांबविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Fasting; Negation of the mandapa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.