शेतीवरील आरक्षणाविरोधात मलकापुरात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:12+5:302021-02-09T04:42:12+5:30
पवार यांनी दिलेल्या पत्रानुसार अरुण पवार, आत्माराम पवार, सीताराम पवार, जगन्नाथ पवार, संभाजी पवार, उमाकांत पवार यांच्या २१ एकर ...

शेतीवरील आरक्षणाविरोधात मलकापुरात उपोषण
पवार यांनी दिलेल्या पत्रानुसार अरुण पवार, आत्माराम पवार, सीताराम पवार, जगन्नाथ पवार, संभाजी पवार, उमाकांत पवार यांच्या २१ एकर १५ गुंठे जमिनीवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व गार्डन, लायब्ररी व शेती, रस्ता, हायस्कूल व प्लेग्राउंड अशी विविध प्रकारची आरक्षणे जाणून-बुजून टाकली आहेत. वेळोवेळी आरक्षित जमिनीपैकी काही जमिनीची मागणी केली. मात्र, विविध मार्गांचा अवलंब करून सत्ताधारी आमची जमीन आमच्याकडून कधी काढून घेतील, या चिंतेने आमची झोप उडालेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह हस्तकांच्या दहशतीखाली आम्ही राहतो. या बिकट परिस्थितीत आम्हावर गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शेतीचा मोबदला द्या किंवा आरक्षण काढून शेतीतरी परत द्या, अशी मागणी पवार कुटुंबाने केली.
पवार कुटुंबीयांनी महिला, मुली व लहान मुलांसह पालिकेसमोरच सोमवारी ठिय्या मारला होता. उपोषणास भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले, शेतीमित्र अशोकराव थोरात, विरोधी पक्षनेते अजित थोरात, नगरसेवक भास्करराव ऊर्फ आबा सोळवंडे, भारत जंत्रे, अण्णा काशीद, दिनेश रैनाक, नितीन काशीद, अजित देसाई, दत्तात्रय शिंगण, अरुण पवार, अरुणादेवी पाटील, सारिका गावडे, संजय पवार, विद्यादेवी शिंदे, अॅड. दीपक थोरात, हणमंतराव जाधव, सूरज शेवाळे, सुरेश खिलारे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
- चौकट
आठ तासांनंतर उपोषण सोडले
पवार कुटुंबीय पालिकेसमोर सोमवारी सकाळी उपोषणास बसले होते. सायंकाळी ५ वाजता डॉ. अतुल भोसले व अशोकराव थोरात यांच्या हस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले.
- चौकट
मुख्याधिकारी मर्ढेकर यांच्याशी चर्चा
उपोषणकर्त्यांनी मागणीचे पत्र मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांना दिले. त्यावेळी मर्ढेकर यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. तुम्ही सहाजणांच्या शेतीसह आरक्षणाबाबत सविस्तर माहिती द्या. ती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवून जो निर्णय होईल तो नगरविकास विभागाकडे पाठवतो, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
फोटो : ०८केआरडी०६
कॅप्शन : शेतीवरील आरक्षणाविरोधात सोमवारी मलकापूर पालिकेसमोर पवार कुुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन केले. (छाया : माणिक डोंगरे)