ठिबक सिंचनावर शेती पिकवा
By Admin | Updated: December 29, 2014 00:04 IST2014-12-28T22:14:08+5:302014-12-29T00:04:14+5:30
शेतकरी प्रशिक्षणात पाणी व्यवस्थापनावर चर्चा

ठिबक सिंचनावर शेती पिकवा
आदर्की : पावसाचे पाणी अडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. फलटणच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी पोहोचले आहे. तरी शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन करून ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करून शेती पिकवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे यांनी केले.
घाडगेवाडी, ता. फलटण येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शेतीतज्ज्ञ डॉ. संतोष वानखेडे, कृषी मंडल अधिकारी सोमनाथ गुंजवटे, उपसरपंच मदन बोबडे, उद्योजक दशरथ बोबडे उपस्थित होते.
डॉ. संतोष वानखेडे यांनी कीड नियंत्रण व डाळिंबांवरील तेलकट डाग व्यवस्थापन याबाबत तर सय्यद मुजावर यांनी एकात्मिक ऊस उत्पादन व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास जनार्दन बोबडे, राजेंद्र धुमाळ, सुरेश साप्ते, दादा नलवडे, हणमंत बागर, अरुण बोबडे, दस्तगीर पठाण, कृषी पर्यवेक्षक विकास भोसले, शहाजी शिंदे, सतीश हिप्परकर, गोविंद शिंगाडे, भगवान गाढवे, रमेश घनवट, शरद खुडे, पी. आर. पवार, सुशीला मोहिते, रमेश नेवसे आदी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
आॅनलाईन काम सुरू
तालुक्यातील १८ डिलरनी आॅनलाईन प्रस्ताव न भरल्याने अडचणी आल्या आहेत. ४३९ प्रस्ताव आॅनलाईन भरण्याचे काम सुरू आहे. रोखीने पैसे भरून ठिबक बसविले त्यांचे प्रस्ताव रखडल्याचे डोईफोडे यांनी सांगितले.