सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतले ११२ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:47+5:302021-01-08T06:08:47+5:30

सातारा : सावकारी व्यवसाय हा विशेषत: शेतकऱ्यांवरच अवलंबून असतो. नोकरदार आणि उद्योजक क्वचितच सावकारांकडून कर्ज घेत असतात. मात्र, सातारा ...

Farmers take loans of Rs 112 crore from moneylenders | सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतले ११२ कोटींचे कर्ज

सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतले ११२ कोटींचे कर्ज

सातारा : सावकारी व्यवसाय हा विशेषत: शेतकऱ्यांवरच अवलंबून असतो. नोकरदार आणि उद्योजक क्वचितच सावकारांकडून कर्ज घेत असतात. मात्र, सातारा जिल्ह्यात नोंदणीकृत सावकारांकडून शेतकऱ्यांनी तब्बल ११२ कोटी ६३ लाख ४० हजार ६८० रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक फलटण तालुका अग्रेसर असून, या तालुक्यातून ५० कोटी ४० लाख ४२ हजार ४९७ रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.

जिल्ह्यात नोंदणीकृत २६६ सावकार आहेत. या सावकारांकडून उद्योजकांपासून नोकरदार आणि शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनीच कर्ज घेतले आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. शेतीच्या मशागतीसाठी तसेच लग्नकार्यासाठी गतवर्षीही कर्ज घेतले असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात नोंदणीकृत २६६ सावकार आहेत. या सावकारांकडे नोकरदार, उद्योजकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनीच कर्ज घेतले आहे. परंतु या कर्ज घेण्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

????????????? पुढील पॅरा वेगळा वाटतो, पाहावे............

आपल्या शहरात नळाला येणारे पाणी दररोज पितो, ते किती स्वच्छ’ याची बातमी आपल्याला करायची आहे. तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध? असाच मथळा या बातमीला द्यायचा आहे. शहरात दररो किती चाचण्या होतात, त्यची तपासणी कुठे होते, नमुने कसे आणि कोठून गोळा करतात याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे.

???????

अनधिकृत सावकारी

जिल्ह्यात खासगी सावकारी मोठ्याप्रमाणात बोकाळली आहे. दोन वर्षात १९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, अनेकजण भीतीपोटी तक्रार करत नाहीत. अन्यथा तक्रारींचा आकडा मोठा आहे. पैसे न दिल्याच्या बदल्यात खासगी सावकार जबदरस्तीने जमीनही नावावर करून घेत असतात.

आत्महत्या टळल्या..

गेले संपूर्ण वर्ष कोरानाच्या महामारीत गेले. अद्यापही हे संकट संपले नाही. शेतकरी वर्ग आता कुठेशी उभारी घेत आहे. सावकारांनीही फारसे आढेवेढे घेतले नाहीत. हे अधिकृत तरी पुढे आले नाही. त्यामुळे गतवर्षी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसल्याची नोंद शासनदप्तरी झाली आहे.

Web Title: Farmers take loans of Rs 112 crore from moneylenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.