पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:57+5:302021-08-15T04:39:57+5:30

औंध : औंध परिसरात पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतली असल्याने खरीप हंगामातील पिके कोमेजून चालली आहेत. श्रावणात कोसळत असणाऱ्या सरी ...

Farmers struggle to save crops! | पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड!

पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड!

औंध : औंध परिसरात पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतली असल्याने खरीप हंगामातील पिके कोमेजून चालली आहेत. श्रावणात कोसळत असणाऱ्या सरी कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, तर हातातोंडाला आलेली पिके वाचवण्यासाठी विजेच्या भरवशावर धडपड सुरू आहे.

पावसाने गेल्या १५ दिवसांपासून पाठ फिरवल्याने शेतीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. अल्पशा पावसावर तग धरून राहिलेली पिके आता कोमजू लागली आहेत. जुलै महिन्याच्या शेवटी खुरपणी उरकून पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी ऑगस्टमध्ये निराश झाला आहे. पुरेशा ओलीअभावी फुलोऱ्यात आलेली पिके करपू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी श्रावणधारा कधी कोसळतात याकडे लक्ष ठेवून आहे.

१४औंध

फोटो: औंध परिसरात पावसाने ओढ दिल्याने पिके कोमजू लागली आहेत. (छाया : रशिद शेख)

Web Title: Farmers struggle to save crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.