शेतकऱ्यांनी बँकेच्या योजनेचा लाभ घ्यावा : सहदेव कारंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST2021-03-06T04:37:25+5:302021-03-06T04:37:25+5:30

औंध : ‘जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध योजना राबविण्यात येतात. विकास सोसायटीने याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ...

Farmers should take advantage of the bank's scheme: Sahadev Karande | शेतकऱ्यांनी बँकेच्या योजनेचा लाभ घ्यावा : सहदेव कारंडे

शेतकऱ्यांनी बँकेच्या योजनेचा लाभ घ्यावा : सहदेव कारंडे

औंध : ‘जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध योजना राबविण्यात येतात. विकास सोसायटीने याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विकास अधिकारी सहदेव कारंडे यांनी केले.

खरशिंगे विकास सेवा सोसायटीच्यावतीने सभासद बाळकृष्ण लाड यांना ट्रॅक्टर मळणी यंत्र देण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष शहाजी घार्गे, उपाध्यक्ष शंकर यादव, सर्व संचालक, विकास अधिकारी सहदेव कारंडे, शाखाप्रमुख एस. आर. घार्गे, बाळकृष्ण लाड, अभिजीत पिसे, मोहन शिंदे, कृष्णत पवार, दादा माळी, सोमनाथ कदम उपस्थित होते. सचिव अभिजीत पिसे यांनी प्रास्ताविक केले तर मोहन शिंदे यांनी आभार मानले. (वा. प्र.)

०५ औंध जाहिरात

फोटो : खरशिंगे सोसायटीच्यावतीने सभासद बाळकृष्ण लाड यांना मळणी यंत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी, सोसायटीचे सचिव उपस्थित होते.

Web Title: Farmers should take advantage of the bank's scheme: Sahadev Karande