शेतकऱ्यांनी काळानुरूप बदलणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:43 IST2021-05-25T04:43:15+5:302021-05-25T04:43:15+5:30
कऱ्हाड येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन बियाणाची पैदासकार ते पायाभूत, पायाभूत ते प्रमाणित व सत्यप्रत ...

शेतकऱ्यांनी काळानुरूप बदलणे गरजेचे
कऱ्हाड येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन बियाणाची पैदासकार ते पायाभूत, पायाभूत ते प्रमाणित व सत्यप्रत बियाणे अशी बियाणे साळखी विकसित करणे, त्याची विक्री करणे या कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, सारंग पाटील, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, उंब्रज मंडल कृषी अधिकारी रवी सुरवसे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र चव्हाण, कृषी सहायक सतीश रणपिसे, विजयसिंह भोसले, तानाजी जाधव, अनुराग भोसले, विनोद सूर्यवंशी, विक्रम जाधव आदींची उपस्थिती होती.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी गट तयार करून पुढाकाराने स्वत:चे बियाणे स्वत: तयार करावे. त्या बियाण्यांची इतरांना विक्री करून जास्तीत जास्त मोबदला मिळवावा. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना योग्य आणि माफक दरात खात्रीशीर उगविण्याची क्षमता असलेले बियाणे उपलब्ध करून द्यावे. हा कार्यक्रम केवळ विक्री प्रारंभ नसून शेतकऱ्यांनी काळाप्रमाणे स्वत:ला बदलले पाहिजे. त्यासाठी आधुनिक माहिती मिळवून पारंपरिक शेतीत बदल केला पाहिजे. तेव्हाच आपला शेतकरी खऱ्याअर्थाने समृध्द होईल.