दूध दरकपातीमुळे शेतकरी कात्रीत
By Admin | Updated: December 30, 2014 23:23 IST2014-12-30T21:54:23+5:302014-12-30T23:23:45+5:30
व्यवसायावर संकट : उपाययोजना आखण्याची मागणी

दूध दरकपातीमुळे शेतकरी कात्रीत
कोपर्डे हवेली : ऊस दराचे घोंगडे भिजत पडले आह़े़ त्यातच गत महिन्यापासून दूधाच्या दरात कपात झाल्याने शेतकरी कात्रीत सापडला असून ऊस शेतीबरोबर दुग्ध व्यवासाय उध्वस्त होण्याची वेळ आली आहे़
शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. शेतीतून निघणाऱ्या उत्पादनाला हमीभाव नसल्याने सध्या शेती हा जुगार ठरत आहे़ नैसर्गिक गोष्टींबरोबर मानवी हस्तक्षेपाचा शेतीला सामना करावा लागत आहे़ दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च वाढत असून त्या तुलनेत उत्पादीत मालाला भाव मिळत नाही़ ऊसदर वाढीसाठी नेहमीच आंदोलने करावी लागत आहेत़ साखरेचे भाव कमी झाल्याने साखर कारखानदारीसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत़
गेल्या वर्षीची साखर कारखन्यांकडे शिल्लक आहे़ यावर्षी गळीत हंगाम सुरू होवून साखर तयार होत आहे़ बाजारपेठेत साखरेला मागणी कमी असल्याने ऊसाला भाव काय मिळणार ? याविषयी शेतकऱ्यांच्यात साशंकता आहे़ ऊस दराचे घोंगडे भिजत पडले आहे़ केंद्र आणि राज्य सरकारने ऊस दराच्या बाबतीत मदत करावी अशी साखर कारखान्यांची मागणी आहे़ (वार्ताहर)