जलसिंंचन योजना उत्कृष्टपणे चालवून शेतकरी हित जोपासा
By Admin | Updated: June 11, 2016 00:52 IST2016-06-10T23:23:40+5:302016-06-11T00:52:11+5:30
सुरेश भोसले : कार्वे धानाई उपसा जलसिंंचन योजनेचा हस्तांतरण समारंभ

जलसिंंचन योजना उत्कृष्टपणे चालवून शेतकरी हित जोपासा
कऱ्हाड : ‘शेतीसाठी पाणी आवश्यक आहे, त्याचबरोबर त्याचे नियोजन करणेही गरजेचे आहे. सहकार महर्षी दिवंगत आप्पासाहेब भोसले यांनी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून उपसा जलसिंंचन योजना उभी करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे . कार्वे गावातील ग्रामस्थांनी उपसा जलसिंंचन योजना चालविण्यास घेऊन मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी जलसिंंचन योजना उत्कृष्टपणे चालवून भागातील शेतकऱ्यांचे हित जोपासावे,’ असे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कार्वे, ता. कऱ्हाड येथील कार्वे धानाई उपसा जलसिंंचन योजना सेवा सहकारी संस्थेच्या हस्तांतरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष लिंंबाजीराव पाटील, संचालक जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजीराव काकडे, माजी संचालक जयवंतराव थोरात, कृष्णा बँकेचे महादेव पवार, रंगराव थोरात, उपसरपंच वैभव थोरात, सचिन थोरात, एस. के. भोईटे, विश्वास शिंंदे, अशोक थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘सहकार महर्षी दिवंगत आप्पासाहेब यांनी ७० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे स्वप्न साकार केले. मात्र, सत्तांतराच्या काळात जलसिंचन योजना अडचणीत आल्या. डॉ. सुरेश भोसले यांनी सत्तेत आल्यावर या योजना पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा सत्तांतरामुळे योजना अडचणीत आली.’ रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंंह पाटील म्हणाले, ‘कारखान्याचा कारभार लोकाभिमुख आहे. कारखाना चांगल्या रितीने सुरू आहे. लोकांच्या हितासाठी लोकांच्या हातात ही संस्था देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय डॉ. भोसले यांनी घेतला आहे.’ यावेळी संचालक जगदीश जगताप, निवासराव पाटील, धनाजी काटकर यांनी मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)