शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जरंडेश्‍वर कारखानाप्रश्‍नी जिल्ह्यातील शेतकरी एकवटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 19:08 IST

Jarndeshwar Sugar factory Satara : जरंडेश्‍वर कारखाना ईडीने जप्त केला असला तरी तो सुरूच ठेवावा. कोरेगावसह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करावे, आदी विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देजरंडेश्‍वर कारखाना सुरू ठेवण्याची मागणी तहसीलदारांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे निवेदन सादर

कोरेगाव : जरंडेश्‍वर कारखाना ईडीने जप्त केला असला तरी तो सुरूच ठेवावा. कोरेगावसह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करावे, आदी विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर केले.दरम्यान, कोरोनाचा फैलाव आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने मोर्चा काढण्याचा निर्णय स्थगित करण्यात येऊन प्रशासनाला निवेदन सादर करण्याचे सर्वानुमते ठरले.चिमणगाव येथील जरंडेश्‍वर कारखाना ईडीने जप्त केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. कारखाना बंद पडता कामा नये, तो सुरूच राहावा, त्याच्यावर हजारोंचा प्रपंच अवलंबून आहे. त्यामुळे कारखाना सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी कोरेगावात शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार होता, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रकोप आणि जमावबंदी आदेश या बाबी लक्षात घेऊन मोर्चा काढण्याचे स्थगित करण्यात आले.जिल्हा बँकेच्या कोरेगाव शहर शाखेपासून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत जमलेले शेतकरी चालत गेले. पोलिसांनी तेथेच त्यांना अडविले, त्यानंतर मोजक्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तहसील कार्यालयात जाऊ देण्यात आले.

वाईचे शशिकांत पिसाळ, राजेंद्र भोसले, किरण बर्गे, विलासराव बर्गे, प्रतिभाताई बर्गे, युवराज कदम, विकास साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर केले. आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही तहसीलदारांनी दिली.तब्बल २२ वर्षांनंतर कोरेगावने अनुभवला अभूतपूर्व बंदोबस्तकोरेगावात १९९९ मध्ये दंगल झाल्यानंतर शहर सुमारे आठ दिवस बंद होते. त्या काळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. त्यानंतर प्रथमच २२ वर्षांनंतर जरंडेश्‍वर कारखान्याच्या निमित्ताने कोरेगावला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. चौकाचौकांत आणि टप्प्याटप्प्यांवर पोलीस तैनात होते. तहसील कार्यालयासमोर अग्निशामक बंब व रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. पोलिसांबरोबरच नायब तहसीलदार हे कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने रस्त्यावर उतरले होते. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkoregaon-acकोरेगावSatara areaसातारा परिसरTahasildarतहसीलदार