सुनीती धायगुडे यांना शेतकरी गुणगौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:30+5:302021-02-05T09:17:30+5:30
खंडाळा : खासदार श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्यावतीने प्रगतशील महिला शेतकरी गुणगौरव पुरस्काराने भादे (ता. खंडाळा) येथील आदर्श महिला शेतकरी ...

सुनीती धायगुडे यांना शेतकरी गुणगौरव पुरस्कार
खंडाळा : खासदार श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्यावतीने प्रगतशील महिला शेतकरी गुणगौरव पुरस्काराने भादे (ता. खंडाळा) येथील आदर्श महिला शेतकरी सुनीती धायगुडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कवठे (ता. वाई) येथे हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या आग्रहास्तव महिला शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खंडाळा, वाई व महाबळेश्वर या तालुक्यांतील दहा महिला कृषीलक्ष्मींना ‘प्रगतशील महिला शेतकरी गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. खंडाळा तालुक्यातून सुनीती सुरेंद्र धायगुडे यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. श्रीनिवास पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील आणि उपाध्यक्षा रचना सारंग पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी कवठेचे सरपंच श्रीकांत वीर,माधवराव डेरे, आनंदराव डेरे, राहुल डेरे, विनोद पोळ, निलेश डेरे, कृष्णराव डेरे, मारुतराव पोळ, मधुकर डेरे, राजेंद्र पोळ, संदीप पोळ, शशिकांत करपे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..........................................
०३खंडाळा पुरस्कार
फोटो : सुनीती धायगुडे यांना प्रगतशील महिला शेतकरी गुणगौरव पुरस्कार देऊन सम्मानित करताना सारंग पाटील, रचनाताई पाटील व मान्यवर उपस्थित होते.