शेनवडीत झोपडीला आग लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: November 30, 2014 00:32 IST2014-11-30T00:30:11+5:302014-11-30T00:32:17+5:30
म्हसवड : झोपडीला आग लागल्याने शेनवडी (ता. माण) येथील ज्ञानू दुर्याेधन खिलारी

शेनवडीत झोपडीला आग लागून शेतकऱ्याचा मृत्यू
म्हसवड : झोपडीला आग लागल्याने शेनवडी (ता. माण) येथील ज्ञानू दुर्याेधन खिलारी (वय ४५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेनवडी येथील वडाचे टेक नावाच्या शिवारात ज्ञानू खिलारी राहत होते. त्यांचे झोपडीवजा घर होते. आज त्यांच्या कुटुंबातील लोक शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. ते घरी एकटेच होते. दुपारी तीनच्या सुमारास झोपडीस आग लागली.
या आगीतून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न खिलारी यांनी केला; पण ते गंभीररीत्या भाजल्याने घराबाहेर येऊन कोसळले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. झोपडीला लागलेली आग एवढी भीषण होती की, त्यामध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. माणचे तहसीलदार महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, ज्ञानू खिलारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)