बीजोत्पादनअंतर्गत निढळ येथे शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST2021-02-10T04:38:31+5:302021-02-10T04:38:31+5:30
पुसेगाव : हरितक्रांती शेतकरी बचत गट, प्रतिभा फार्मर्स प्रोडुसर कंपनी, माळेगाव (बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने निढळ येथे हरभरा बीजोत्पादन ...

बीजोत्पादनअंतर्गत निढळ येथे शेतीशाळा
पुसेगाव : हरितक्रांती शेतकरी बचत गट, प्रतिभा फार्मर्स प्रोडुसर कंपनी, माळेगाव (बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने निढळ येथे हरभरा बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कमीत-कमी खर्चात जास्तीत-जास्त उत्पादन घेऊन आर्थिक स्थिती कशी सुधारेल, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
‘फुले विक्रम’ हा वाण एकरी १६ ते १७ क्विंटल उत्पादन देणारा वाण आहे. या वाणाचे जिल्ह्यात उत्पादन घेणारा हरितक्रांती शेतकरी हा एकमेव बचत गट आहे. सध्या २० एकरांवर हा कार्यक्रम राबवला आला आहे. सद्यस्थितीत हरभरा हार्वेस्टिग स्थितीत आला आहे. यासाठी प्रतिभा फार्मर्सचे अशोक तावरे यांनी कीड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. पुढीलवर्षी १०० ते १५० एकर क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जाणार आहे. भविष्यात कमीत-कमी खर्चात जास्तीत-जास्त उत्पादन घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल, यावर भर दिला जाईल.